मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – विधानसभेचा निकाल लागून सात दिवस झाले असले तरी राज्यात सत्तास्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. त्यात भाजपने जर ५०-५० भूमिका घेतली नाही तर शिवसेना भाजपशिवाय बहुमत मिळवत सत्ता स्थापन करेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र दुसरीकडे सत्ता स्थापनेविषयी उद्धव ठाकरे यांनी आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव ठेवला नाही असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. तसेच संजय राऊत यांच्यासोबतही कोणतीच राजकीय चर्चा झाली नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं.
दरम्यान पवार यांच्या भेटीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असेल अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांनी मांडली होती. दरम्यान, पवार यांच्या या खुलाश्यामुळे आता राजकीय वातावरण आणखी पेटण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांनी संगितले कि, आम्ही विरोधी पक्षातच असणार आहोत. सत्ता स्थापनेविषयी आमच्यासमोर कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. आमच्याशी कोणाचेही बोलणे झालेले नाही. तसेच माझा काँग्रेसवरही विश्वास आहे. तेदेखील शिवसेनेला कधीही पाठिंबा देणार नाहीत असा आत्मविश्वास देखील पवारांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे सत्तेसाठी सध्या दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरु आहे. तरी जो दमेल त्याला नमतं घ्यावं लागेल. भाजपने कितीही अपक्ष उमेदवारांना हाताशी धरलं तरी ते बहुमताचा आकडा गाठू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांना शिवसेनेची मागणी मान्य करावी लागेल. असं शरद पवारांनी सांगितलं आहे.
सोनिया गांधी यांच्याशी माझे बोलणे मतमोजणीच्या दिवशीच झाले. पण त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी कोणतेही बोलणे झाले नाही. आमच्यामध्ये देशातील आर्थिक परिस्तितीविषयी चर्चा झाली असून त्यासाठीच मी ३ नोव्हेंबरला दिल्लीला जाणार आहे,’ अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.
Visit : Bahujannama.com
- ‘हे’ १० पदार्थ आहेत अतिशय उपयुक्त, शरीरातील निकोटीन होईल ‘फ्लश आऊट’! –
- उपवास करणे फायद्याचे, पण या लोकांनी करू नये, अन्यथा होईल नुकसान ! –
- ‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
- तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
- मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
- संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या –