मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – भाजपा, शिवसेनेकडून एकमेकांना दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी महत्वाचा फॅक्टर आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ता स्थापनेबद्दल भाकीत वर्तवले आहे.
शरद पवार यांनी सांगितले की, सत्ता स्थापनेचा प्रश्न पुढील १० दिवसात सुटेल. शिवसेना आणि भाजपा एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील. विशेष म्हणजे सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्यासाठी भाजपाला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यावे लागेल, असा अंदाज शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
आम्हाला इतर पर्याय उपलब्ध आहे, असे सांगणाऱ्या शिवसेनेला शरद पवार यांनी धक्का दिला आहे. शिवसेनेकडून आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तसेच शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा नसून आम्ही विरोधी पक्षात बसणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
एका बाजूला शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्यास काँग्रेस तयार होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांची शिवसेनेबरोबर जाण्याची तयारी आहे. असे असतानाही शरद पवार यांनी शिवसेनेला विरोधाची भूमिका कायम असल्याचे सांगितले.
२०१४ मध्येही निकालानंतर भाजपाने शिवसेनेबरोबर जाऊ नये, यासाठी भाजपाने न मागता व पूर्ण निकाल लागलेले नसतानाही शरद पवार यांनी भाजपा पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकार आपल्यावरील विश्वासदर्शक ठराव संमत करु शकले होते. आताही शरद पवार यांनी शिवसेना विरोधाची भूमिका कायम ठेवत भाजपाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
Visit : Policenama.com
- जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार
‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या