कल्याण : बहुजननामा ऑनलाईन – कल्याणमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या एका बंडखोर आमदाराने पक्षाला सोडचिठी दिली आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातील भाजपचे बंडखोर आमदार नरेंद्र पवार हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी फेसबुक वर एक पोस्ट केली आहे की, यामुळे पक्षाला अडचण निर्माण होऊ नये यासाठी आपण भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे नरेंद्र पवार यांनी सांगितले.
कल्याण पश्चिम मतदार संघाची जागा शिवसेनेकडे असल्यामुळे भाजपला तिथे जागा नसल्यामुळे भाजपचे बंडखोर आमदार नरेंद्र पवार हे अपक्ष लढत आहेत. या जागेवरून आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. मात्र त्याबाबत कुठलीच चर्चा झाली नाही. अखेर विश्वनाथ भोईर यांना शिवसेनेने तिकीट दिले. त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या कांचन कुलकर्णी मैदानात आहेत.
Visit : bahujannama.com