पन्ना : वृत्तसंस्था – नशीबाचे काही खरे नसते, कधी बदलेल सांगू शकत नाही. असेच काहीसे मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील काही मजुरांच्या बाबतीत घडले होते. त्यांना खोदकामात जमीनीत तीन मौल्यवान हिरे (Diamonds) सापडले होते. या घटनेवर स्वता त्या मजूरांचा सुद्धा विश्वास बसत नव्हता, की त्यांचे नशीब रातोरात बदलले आहे.
पन्ना जिल्ह्यातील जरुआपुर उथली खाणीत काम करताना मजूरांना हिरे (Diamonds) मिळाले होते.
हिर्यांचे वजन वेगवेगळे 4.45, 2.16, 0.93 कॅरेट होते. तिनही हिर्यांचे एकुण वजन 7.59 कॅरेट होते.
हे जेम क्वालिटीचे हिरे होते तिनही हिर्यांची बाजारातील एकुण किंमत 30 ते 35 लाख रुपये झाली होती.
मात्र, तिनही हिरे पन्नाच्या कार्यालयात जमा करण्यात आले होते. लिलावानंतर ही रक्कम मजूरांना वाटण्यात आली होती.
मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्याच्या जरुआपुरमध्ये उथळी हिर्याची खाण आहे.
गावातील मजूर सवल सरदारला हिरे कार्यालयाने खासगी क्षेत्र जरुआपुरमध्ये उत्खननासाठी 8 बाय 8 मीटरचा पट्टा दिला होता.
मजूर सवल सरदार याच खाणीत खोदकाम करत होता या दरम्यान त्यांना तीन हिरे सापडले.
सवल सरदार सोबत आणखी सहा मजूर काम करत होते.
हिरे मिळताच सर्वजण आनंदाने बेभान झाले.
यानंतर या हिर्यांबाबत कार्यालयाला माहिती देण्यात आली होती.
नंतर ते पन्नाच्या डायमंड कार्यालयात जमा करण्यात आले होते.
येथे हिर्यांचा लिलाव झाला होता, यानंतर त्यांची रॉयल्टी कापून उर्वरित पैसे जमकत्यांना दिले गेले होते.
सवल सरदार सांगितले होते की, 2 महिल्याच्या प्रचंड मेहनतीनंतर त्यांना 3 हिरे मिळाले होते.
कृपया हे देखील वाचा:
… म्हणून देशात कोरोनाची दुसरी लाट पसरली – WHO
पुण्यात लाचखोरी रोखण्यासाठी ‘गुगल पे’ची ‘मात्रा’?
मोफत रेशन घेण्यासाठी घरबसल्या बनवा Ration Card; जाणून घ्या ऑनलाइन अप्लाय करण्याची संपूर्ण प्रोसेस
2 दिवसांत महाराष्ट्रात धडकणार ‘मान्सून’; जाणून घ्या सद्यस्थिती
‘कोरोना हा आजार नाही, अल्लाहसमोर रडत माफी मागितल्यास होईल नष्ट’; उत्तरप्रदेशातील खासदाराचं विधान