नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना काळात सरकार रेशनवर मोफत धान्य देत आहे. परंतु जर तुमच्याकडे अजूनपर्यंत रेशनकार्ड नसेल तर आता तुम्ही घरबसल्या बनवू शकता. स्मार्टफोनवरून ऑनलाइन रेशन कार्डसाठी (online ration card) अप्लाय करू शकता. यासाठी सर्व राज्यांनी आपल्या वेबसाईट बनवल्या आहेत. तुमच्या राज्याच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन रेशन कार्डसाठी (online ration card) अप्लाय करू शकता.
* असे करा अप्लाय
1. सर्वप्रथम तुमच्या राज्याच्या अधिकृत वेबसाइटवर जा. जर उत्तर प्रदेशचे असाल.
तर https://fcs।up।gov।in/
2. यानंतर अॅप्लाय ऑनलाइन फॉर रेशन कार्ड च्या लिंकवर क्लिक करा.
3. ऑनलाइन रेशन कार्ड बनवण्यासाठी आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी देता येईल.
4. रेशन कार्डसाठी अर्ज शुल्क 5 रुपयांपासून 45 रुपयांपर्यंत आहे. अर्ज भरल्यानंतर शुल्क जमा करा आणि अॅप्लीकेशन सबमिट करा.
5. फील्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जर तुमचा अर्ज योग्य आढळला तर रेशनकार्ड तयार होईल.
भारतीय नागरिक यासाठी अर्ज करू शकतात. 18 वर्षापर्यंतच्या मुलांचे नाव पालकांच्या कार्डमध्ये असते. 18 वर्षावरील आपले वेगळे कार्ड बनवू शकतात.
हे कागदपत्र आवश्यक
आयडी प्रूफसाठी – आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, सरकारद्वारे जारी कोणतेही आय कार्ड, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स. तसेच पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला. पत्त्याचा पुरावा – विज बिल, गॅस कनेक्शन बुक, बँक स्टेटमेंट, रेंटल अॅग्रीमेंट.
कृपया हे देखील वाचा:
2 दिवसांत महाराष्ट्रात धडकणार ‘मान्सून’; जाणून घ्या सद्यस्थिती
‘कोरोना हा आजार नाही, अल्लाहसमोर रडत माफी मागितल्यास होईल नष्ट’; उत्तरप्रदेशातील खासदाराचं विधान
कोरोनाबाधितानं मंत्र्यांसह शेकडो जणांना दिला ‘प्रसाद’, 30 जणांना लागण
खुशखबर ! 2 दिवसांमध्ये सोनं 1000 रूपयांनी स्वस्त अन् चांदी देखील घसरली, जाणून घ्या आजचे दर
Good News ! मान्सूनपुर्वीच पुण्याच्या परिसरातील धरणांमध्ये 7 वर्षांमधील सर्वाधिक पाणीसाठा