नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून सोन्या- चांदीच्या भावात सातत्याने चढउतार दिसून येत आहे. गेल्या सत्रातील घसरणीनंतर शुक्रवारी (दि. 4) पुन्हा एकदा सराफ बाजारात सोने- चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले. एमसीएक्सवर वायदा बाजारातील सोन्याचा दर 0.12 टक्यांनी घसरून 48,619 रुपये प्रति 10 ग्रॅमवर, तर चांदीचा दर 0.1 टक्क्यांनी घसरून 70,722 रुपये प्रति किलो ग्रॅमवर आला आहे. सोन्याचा दर 2 दिवसांत 1 हजार रुपयांनी घसरला आहे. तर चांदीचा दर 2 हजारांनी कमी झाली आहे.
गेल्या सत्रात सोन्याचा दर 2 टक्क्यांनी कमी झाला होता. तर चांदीचा दर 2.5 टक्के प्रति किलोने कमी झाला होता. मार्च महिन्यात सोन्याचा दर जवळपास 44 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षाही कमी झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोने मजबूत डॉलरमुळे 2 आठवड्यांचा विचार करता खालच्या स्थरावर पोहोचले आहे. स्पॉट सोने 0.4 टक्क्यांनी घसरून 1,862.68 डॉलर प्रति औंस वर आले आहे. गेल्या सत्रात यात 2 टक्क्यांची घसरण झाली होती. इतर मौल्यवान धातूंमध्ये चांदी 0.5 टक्क्यांनी घसरून 27.31 डॉलर प्रति औंसवर आली होती. प्लॅटिनम 0.7 टक्क्यांनी घसरून 1,148.50 डॉलरवर आले होेते. डॉलर इंडेक्स 3 आठवड्यात 90.543 वर पोहोचला आहे. दरम्यान कोरोना काळात लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला आहे.
कृपया हे देखील वाचा:
Good News ! मान्सूनपुर्वीच पुण्याच्या परिसरातील धरणांमध्ये 7 वर्षांमधील सर्वाधिक पाणीसाठा
राजीव सातव यांच्या जागेवर आता कोण? गांधी कुटुंबियांमध्ये नावावरून मतभेद
मोदी सरकारने डेडलाईन बदलली, पेट्रोलबाबत घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
लाखोंची बेहिशेबी मालमत्ता, निवृत्त पोलीस अधिकाऱ्यासह पत्नी, मुलावर FIR