नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाच्या दुस-या लाटेने थैमान घातले आहे. WHO ने केलेल्या अभ्यासानुसार देशात कोरोनाची दुसरी लाट पसरण्यामागे डेल्टा वेरियंटची (Delta variant) महत्त्वाची भूमिका होती. डेल्टा वेरियंट (Delta variant) अल्फापेक्षा 50 टक्के जास्त संर्गजन्य असल्याने विषाणू संक्रमण वेगाने होत असल्याचे WHO ने म्हटले आहे.
दरम्यान देशात ऑक्टोबर 2020 मध्ये आढळलेल्या B.1.617.2 व्हेरियंटला डेल्टा व्हेरियंट म्हटले आहे. यातील डेल्टा व्हेरियंटचा 1 विषाणू स्वरूपच फक्त घातक असून इतर 2 प्रकारांचा धोका कमी झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगिले. देशात मे महिन्याच्या सुरुवातीला आढळलेल्या कोरोना स्ट्रेनला भारतीय म्हणण्यावरून वाद झाला होता. केंद्र सरकारने त्या बातम्यांवर आक्षेप घेतला होता. WHO ने कोरोनाच्या B.1.617 व्हेरियंटला भारतीय व्हेरियंट नाव दिल्याचे म्हटल गेले होते.
सरकारने म्हटल होतं, की WHO ने कधीही भारतीय असा उल्लेख केला नाही. अनेक माध्यमांनी वृत्त दिले होते की, WHO ने B.1.617 व्हेरियंट जागतिक समुदायासाठी घातक असल्याचे म्हटले आहे. मात्र, या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्टकरीण WHO ने केले होते. भारतीय व्हेरियंट या शब्दावर सरकारने आक्षेप घेतल्यानंतर WHO नेही यावर प्रतिक्रिया दिली होती. WHO कोणत्याही व्हेरियंटला देशाच्या नावावरून नाव देत नाही. संघटना व्हायरसच्या स्वरुपाला त्याच्या शास्त्रीय नावानेच संबोधित करते आणि इतरांनी देखील असेच करावं अशी आशा असल्याचे ट्विट जागतिक आरोग्य संघटनेने केले होते.
पुण्यात लाचखोरी रोखण्यासाठी ‘गुगल पे’ची ‘मात्रा’?
मोफत रेशन घेण्यासाठी घरबसल्या बनवा Ration Card; जाणून घ्या ऑनलाइन अप्लाय करण्याची संपूर्ण प्रोसेस
2 दिवसांत महाराष्ट्रात धडकणार ‘मान्सून’; जाणून घ्या सद्यस्थिती
‘कोरोना हा आजार नाही, अल्लाहसमोर रडत माफी मागितल्यास होईल नष्ट’; उत्तरप्रदेशातील खासदाराचं विधान
कोरोनाबाधितानं मंत्र्यांसह शेकडो जणांना दिला ‘प्रसाद’, 30 जणांना लागण