नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशात अनेक नेते, मंत्री, अधिकारी, व्यापारी, कंत्राटदार, पत्रकारांमध्ये अनेक दिवसांपासून भयावह परिस्थिती आहेत. हे ते लोक आहेत ज्यांना जाणूनबुजून या प्रकरणात प्रवेश केला, परंतु जेव्हा त्यांचे अश्लील विडिओ समोर आले, तेव्हा प्रत्येकाची पळता भुई थोडी झाली. मध्य प्रदेशातच काय देशात यापेक्षा मोठे प्रकरण कधीच समोर आले नव्हते. मोठ्या संख्येने सफेद -कॉलर, आदरणीय, प्रभावशाली व्यक्ती एकेक करून उघडकीस येत आहेत, हे पाहून एसआयटीसुद्धा कोणास दाखवावे आणि कोणास लपवावे याबद्दल संभ्रमित आहे.
२८ आमदार, १३ आयएएस, १२ व्यापारी, ४ मंत्री, ३ खासदार, ४ पत्रकार आणि एक माजी मुख्यमंत्री अशी एकत्र यादी पहिल्यांदाच समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मध्य प्रदेशात, जे कोणी मोठे, प्रभावशाली आणि शक्तिशाली व्यक्तिमहत्व आहेत, तेच जास्त घाबरले आहेत. जून २०१९ मध्ये मध्य प्रदेशात पहिल्या फोटो आणि व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली होती. या अश्लील फोटोमधील व्यक्ती सामर्थ्यवान होती. मध्य प्रदेशातील प्रतिष्ठित आय.ए.एस. अधिकारी या व्हिडिओमध्ये एका मुलीसोबत आपत्तीजनक परिस्थितीत होता. लोक व्हिडिओचा आनंद घेऊ लागले. मोबाईलद्वारे हा व्हिडिओ मध्य प्रदेश पोलिसांच्या मोबाइलमध्येही दाखल झाला होता. तेथूनच हि मज्जा सजा बनण्यास सुरुवात झाली.
पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर व्हिडिओमध्ये दिसणारी महिला आरती दयाल असल्याचे समोर आले. दरम्यान आरतीने राजकारणातही तिचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. पण काही उपयोग झाला नाही. पण यानंतर पोलिसांनी अधिक तपासाला सुरुवात केली तेव्हा त्यांना धक्का बसला. अलीकडच्या काळात सामान्य कुटुंबातील आरती अचानक श्रीमंत झाल्याचे दिसून आले. बँक खात्यांची भरभराट होऊ लागली होती. पॉश भागात मालमत्ता खरेदी केली गेली. महागड्या वाहनेही होती.
पोलीस आरतीच्या मोबाइलद्वारे पुढील तपस करत असून त्यातून अनेक बड्या नेत्यांचा, अधिकाऱ्यांचा, या पत्रकारांचा संबंध असल्याचे आढळून आले. अनेक रहस्य एकामागून एक उघडकीस येत आहेत. या प्रकणाचा तपास करण्यासाठी सरकारने एक विशेष तपास पथक अर्थात एसआयटी केली. चौकशी सुरू झाली असता तपासाच्या सुरूवातीलाच एसआयटीला हे प्रकरण हनी ट्रॅपचा असल्याचे समजले. खरे तर आरती दयाल सेक्स आणि ब्लॅकमेलिंगचा सिंडिकेट चालवत होती. तिच्यासह आणखी ४ मुलींचा सहभाग आहे. जस जसा तपास होत आहे तस तसा या प्रकरणाचा उलगडा होत आहे. मोठं मोठमोठ्यांची नावे, एसआयटीला मिळाली आहे. परंतु अडचण अशी होती की आतापर्यंत हे प्रकरण माध्यमांद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील लोकांपर्यंत पोहोचले आहे. म्हणून या प्रकरणात बळी ठरलेल्या कमकुवत दुव्याचा शोध सुरू झाला. जेणेकरून या प्रकरणाचा उलगडा होईल.
Visit : bahujannama.com