बहुजननामा ऑनलाईन टीम – वॉटरप्रूफ स्मार्टफोनची अशी बरीच प्रकरणे समोर आली आहेत,जे पाण्यात भिजल्यानंतरही चालू असल्याचे आढळले आहे. पण अलीकडेच आयफोनबद्दल अशी एक घटना समोर आली आहे. ती थोडी अविश्वसनीय आहे. मायकेल बेनेट (Michael Bennett) नावाच्या अमेरिकन युट्यूबरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, त्याला नदीत 15 महिन्यापासून बुडलेला एक जुना आयफोन आढळला, सध्या जो उत्तम प्रकारे काम करत आहे . ‘नगेट्नोगिन’ (‘nuggetnoggin’ ) नावाने यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या या व्यक्तीचे म्हणणे आहे की,त्याला आयफोन मिळाल्यानंतर त्याचा खरा मालकही त्यांनी शोधून काढला आणि त्याला त्याचा फोन परत केला.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बेनेटला दक्षिण कॅरोलिनामधील एडिस्टो नदीच्या आत डायव्हिंग करताना दाखवले आहे. नदीच्या तळाशी पोहोचताना त्याला हा आयफोन मिळाला . फोनवर पहिल्या दृष्टीक्षेपात असे दिसून आले की तो फोन वनस्पतींनी गुंडाळलेला आहे, परंतु झूम केल्यानंतर असे आढळले की फोन वॉटरप्रूफ पाकिटात ठेवला होता त्यामुळे त्यामध्ये काहीच पाणी नव्हते.
यानंतर बेनेटने फोन घरी आणून, चार्ज करून चालू केला. तेव्हा हा फोन सुरु असल्याचे त्याच्या लक्षात आले. यानंतर, तो फोनची खरी मालकिन एरिका बेनेटला संपर्क साधून फोन परत दिला . जून 2018 मध्ये एरिका बेनेट कुटुंबासोबत सहलीसाठी गेली असता तिथे तिचा आयफोन हरवला होता.मायकेल बेनेटला फोन सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. बेनेटने यापूर्वी आयफोन एक्सआरचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला होता.
Visit : bahujannama.com