नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या मुलीशी नातेसंबंध असलेल्या एका व्यक्तीवर ३६ वेळा बलात्काराचा आरोप आहे. एका वृत्तसंस्थेनुसार युनायटेड किंगडममधील साऊथ वेल्समध्ये राहणाऱ्या या व्यक्तीवर आपल्या मुलीशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि त्याने किमान सहा मुलांना जन्म दिला आहे. मात्र, संशयिताने बलात्काराचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
पीडित मुलीची ओळख उघडकीस आल्याने वडिलांचे नाव समोर आले नाही. आपल्या मुलीवर ब्रेन वॉश करुन तिला बनावट जग दाखविल्याचा त्याच्यावर आरोप आहे. युकेच्या स्वानसी क्राउन कोर्टात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. आपल्या मुलीशी संबंध ठेवण्या व्यतिरिक्त त्याने आपल्या दोन मुलांचेही शोषण केले. या प्रकरणात तीन आठवड्यांपर्यंत कोर्टात सुनावणी होऊ शकते.
फिर्यादी जॉन हिपकिन यांनी न्यायालयात सांगितले की हा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये आरोपींनी पद्धतशीरपणे मुलीला तयार केले व नंतर तिचे शोषण केले. फिर्यादीने सांगितले की आरोपीने आपल्या लैंगिक वासनांसाठी त्याने पीडितेसोबत त्याला हवे ते केले.न्यायाधीशांना असेही सांगण्यात आले की त्याने केवळ स्वतःनेच बलात्कार केला नाही तर इतर पुरुषांनाही बलात्कार करण्याची परवानगी दिली. या प्रकरणात डीएनए पुरावेही सादर केले जातील असे फिर्यादींनी कोर्टाला सांगितले. यावरून हे सिद्ध होते की, आरोपीने कमीतकमी सहा मुलांना जन्म दिला. पहिल्यांदा जेव्हा ती मुलगी प्रेग्नेंट झाली तेव्हा ती १६ वर्षांची होती.
Visit : bahujannama.com