मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – एका मॉडेलला वेबसीरिजमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून पॉर्न व्हिडीओ (porn video) बनवला. तसेच तो व्हिडीओ (porn video) सोशल मीडियावर अपलोड करून बदनामी केल्याप्रकरणी दिग्दर्शकासह चौघांविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, मॉडेलिंग करणाऱ्या तरुणीने बॉलीवूडमध्ये काम मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते.
त्यावेळी तिला एका दिग्दर्शक असलेल्या एका व्यक्तीचा फोन आला.
त्याने तिला वेबसिरीजमध्ये नायिका म्हणून काम देण्याचे आमिष दाखवले.
त्यानंतर मार्च महिन्यात तिला त्याने मालवणी येथील मढ परिसरातील एका बंगल्यात बोलाविले होते.
बंगल्यात दिग्दर्शकासह इतर तीनजण होते.
त्यावेळी तिच्याकडून काही अश्लील दृश्ये चित्रीकरण करण्यात आली होती.
व नंतर सोशल साईटवर जिजा का पिझ्झा या नावाने हा व्हिडीओ (porn video) अपलोड झाला होता.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला धक्काच बसला होता.
त्यानंतर तिने मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे दिग्दर्शकासह इतर तिघांविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती, या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.
काही दिववसांपूर्वी मढ परिसरातील बंगल्यात पॉर्न व्हिडीओ बनवून मॉडेलची फसवणूक करणाऱ्या टोळीचा प्रॉपटी सेलने पर्दाफाश केला होता.
चित्रपटात काम करण्याचे आमिष तसेच कमी मानधन देत पॉर्न व्हिडीओमध्ये काम करण्यास प्रवृत्त करीत होते.
एका मॉडेलनेच या प्रकरणाचा भांडाफोड केली होती. त्यानंतर अशाच प्रकारची दुसरी तक्रार पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी आता अशा प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासास सुरुवात केली आहे आतपर्यंत कोणालाही अटक झालेली नाही असे तापसी अधिकार्यांनी सांगितले.
कृपया हे देखील वाचा:
‘विषय राज्याच्या हाती, पाठपुरावा मात्र केंद्राकडे’
ठाकरे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु शकेल का ?, आदित्य ठाकरे म्हणाले…
शिवसेनेकडून पुन्हा एकदा स्पष्टोक्ती ! म्हणाले – ‘सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो’