पुणे : बहुजननामा ऑनलाईन – रक्तचंदनाची blood sandalwood तस्करी करणाऱ्या तीन जणांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 27 लाख रुपयांचे रक्तचंदन blood sandalwood जप्त केले आहे. त्याचे वजन 270 किलो आहे.
विकी संजय साबळे (वय 19, रा. मांजरी), रोहित रवी रुद्राप (वय 20, रा. कोंढवा) या दोघांसह त्यांचा रक्तचंदन देणारा अनिल कन्हैया वाघमारे (वय 25, रा. कोंढवा) यांना अटक केली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात वाढत असलेल्या घरफोड्या व चोऱ्या रोखण्याच्या सूचना स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेला देण्यात आल्या आहेत.
यानुसार गुन्हे शाखा हद्दीत गस्त घालत कारवाई करत आहे.
यादरम्यान खंडणी विरोधी पथक दोनला माहिती मिळाली कि, कोंढवा येथून रक्तचंदन गाडीत घेऊन लोणी काळभोर परिसरात विक्री करण्यास येणार आहे.
त्यानुसार पथकाने येथे सापळा रचला. पिकअप गाडी येताच पथकाने ती अडवून पाहणी केली.
तर त्यात रक्तचंदन दिसून आले.
विकी व रोहित या दोघांना पकडले.
चौकशीत रक्तचंदन त्यांना वाघमारे याने दिल्याचे समजले. त्यालाही अटक केली.
त्यांच्याकडून 27 लाखांचे 270 किलो रक्तचंदन आणि गाडी असा 32 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
हि कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे.
उपनिरीक्षक विजय झंझाड, श्रीकांत चव्हाण, संपत अवचरे, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, अमोल पिळणे, भूषण शेलार यांच्या पथकाने केली आहे.
कृपया हे देखील वाचा:
शिवसेनेकडून पुन्हा एकदा स्पष्टोक्ती ! म्हणाले – ‘सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो’
चिखलीतील रासायनिक पावडर असलेल्या गोडावूनला ठोकले टाळे; मालकावर FIR दाखल, महापालिकेची कारवाई