LPG Cylinder Price | नवीन वर्षात मोठी भेट ! थेट 100 रुपये स्वस्त झाला कमर्शियल LPG सिलेंडर, घरगुती सिलेंडरमध्ये बदल झाला का?, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LPG Cylinder Price | नवीन वर्षात इंडियन ऑईलने (Indian Oil) लोकांना मोठी भेट दिली आहे. इंडियन ऑईलने कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 100 रुपयांची कपात करण्याचा (Commercial LPG Cylinder Rates Decreases) निर्णय घेतला आहे. यामुळे लोकांना खुप दिलासा मिळेल. मात्र, घरगुती सिलेंडरच्या दरात (Domestic LPG Cylinder Rates) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. (LPG Cylinder Price) यापूर्वी मागील डिसेंबर महिन्यात कमर्शियल एलपीजी सिलेंडरचे दर वाढवले होते. डिसेंबरमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात 100 रुपयांची वाढ करण्यात आली होती.
मात्र, लोकांसाठी दिलासादायक बाब ही होती की, घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल (LPG Cylinder Price) करण्यात आला नव्हता. कमर्शियल सिलेंडरच्या किमती कमी केल्याने रेस्टॉरंटवाल्यांना दिलासा मिळाला आहे.
100 रुपयांच्या कपातीनंतर दिल्लीत 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरची (Commercial LPG Cylinder) किंमत 2001 रुपयांवर गेली आहे. त्याचबरोबर कोलकातामध्ये कमर्शियल एलपीजी सिलिंडरची किंमत 2077 रुपयांवर गेली आहे. मुंबईत 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरची (LPG Cylinder) किंमत 1951 रुपयांवर गेली आहे.
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल नाही
यावेळीही घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती गेल्या ऑक्टोबरमध्ये वाढवण्यात आल्या होत्या. दिल्ली आणि मुंबईमध्ये विनाअनुदानित 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपये आहे. कोलकातामध्ये त्याची किंमत 926 रुपये आहे, तर चेन्नईमध्ये 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलेंडर 915.5 रुपयांना मिळत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तुमच्या शहरातील एलपीजी सिलिंडरची किंमत कशी तपासायची?
तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाणून घ्यायच्या असतील,
तर तुम्ही सरकारी तेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ते पाहू शकता. यासाठी तुम्ही IOCL वेबसाइटवर जा(cx.indianoil.in/webcenter/portal/Customer/pages_productprice).
यानंतर, वेबसाइटवर राज्य, जिल्हा आणि वितरक निवडा आणि नंतर सर्च पर्यायावर क्लिक करा. यानंतर गॅस सिलिंडरच्या किमती तुमच्या समोर येतील.
Web Title :- LPG Cylinder Price | commercial lpg cylinder cheaper by hundred rupees indian oil decision on new year 2022
Bhagat Singh Koshyari | 1 हजार 844 कोटींच्या प्रकल्पांची चौकशी; राज्यपालांचा शिवसेनेला झटका
Comments are closed.