नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता, परंतु 1 ऑगस्टला किंमतीत बदल न झाल्याने लोकांना खुशखबर मिळाली आहे. यापूर्वी मागील दोन महिन्यांत स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत वाढ झाली होती. चेन्नईमध्ये 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात केली आहे.
आयओसीएलच्या वेबसाईटनुसार, राजधानी दिल्लीत विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडर (14.2 किलो) चा दर या महिन्यात 594 रुपये राहील. मागील महिन्यात सुद्धा लोकांना दिल्लीत यासाठी एवढीच किंमत मोजावी लागत होती. यापूर्वी जूनमध्ये दिल्लीकरांना एका एलपीजी सिलेंडरसाठी 593 रुपये मोजावे लागत होते. जूनमध्ये विना अनुदानित एलपीजी सिलेंडमध्ये 12 रुपये वाढवले होते.
तर कोलाकातामध्ये विना अनुदानित एलपीजी सिलेंडर 621 रुपयांना मिळेल, याच्या किंमतीत 50 पैशांची वाढ केली आहे. मागच्या महिन्यात याची किंमत 620.50 रुपये होती. मुंबईत एलपीजी सिलेंडरसाठी 594 रुपये मोजावे लागतील आणि याच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. अशाच प्रकारे चेन्नईमध्ये याची किंमत 610.50 रुपये राहील. लोकांना मागील महिन्यात सुद्धा एवढीच किंमत मोजावी लागली होती.
चेन्नईत 19 किलोचा सिलेंडर झाला स्वस्त
चेन्नईत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरचा दर 1253 रुपये झाला आहे, यात आता ग्राहकांना 2 रुपयांचा लाभ झाला आहे. मागील महिन्यात याची किंमत 1255 रुपये होती. जूनमध्ये ग्राहकांनी यासाठी 1254 रुपये मोजले होते. दिल्लीत याची किंमत मागच्या महिन्याप्रमाणेच 1135.50 रुपये कायम राहील.
जूनमध्ये हा दर 1139.50 रुपये प्रति सिलेंडर होता. कोलकातामध्ये याच्या किंमतीत एक रुपयांची वाढ झाली आहे. आता लोकांना याच्यासाठी 1198.50 रुपये द्यावे लागतील, तर मागच्या महिन्यात याच्यासाठी त्यांनी 1197.50 रुपये मोजले होते. मुंबईमध्ये याची किंमत 50 पैशांनी वाढली आहे. आता याच्यासाठी 1091 रुपये मोजावे लागतील, येथे मागच्या महिन्यात याची किंमत 1090.50 रुपये होती.