नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय लष्कराने सोल्जर जनरल ड्यूटी (महिला सैन्य पोलीस) च्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. योग्य आणि इच्छुक उमेदवारांनी ही नोकरी मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in च्या माध्यमातून 27 जुलै 2020 ते 31 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज करावा. भारतीय लष्कराच्या अंबाला, लखनऊ, जबलपुर, बेंगळुरु, शिलाँग आणि पुणे या ठिकाणी भरती रॅली आयोजित करण्यात येईल.
पदांची माहिती :
पदाचे नाव :
सोल्जर जनरल ड्यूटी (महिला सैन्य पोलीस)
पदांची एकुण संख्या :
एकुण 99 पदे
वयोमर्यादा :
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय 30 वर्ष आहे. अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन पहावे.
महत्वाच्या तारखा :
नोटिफिकेशन जारी होण्याची तारीख : 27 जुलै, 2020
अर्ज जमा करण्याची तारीख : 27 जुलै, 2020
अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट, 2020
शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता मॅट्रिक / 10 वी / एसएसएलसी किंवा समकक्ष असावी. शैक्षणिक पात्रतेसंबंधी अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन पहा.
अर्ज प्रक्रिया :
उमेदवाराने अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट www.joinindianarmy.nic.in वर जावे आणि नोटिफिकेशन डाऊनलोड करून वाचावे. सर्व माहिती जाणून घेवून दिलेल्या निर्देशांनुसार अर्ज प्रक्रिया 27 जुलै, 2020 ते31 ऑगस्ट, 2020 अंतिम तारखेपर्यंत पूर्ण करावी. लक्षात ठेवा कोणत्याही प्रकारची त्रुटी राहिल्यास अर्ज स्वीकरला जाणार नाही.
निवड प्रक्रिया :
या पदावर नोकरी मिळवण्यासाठी उमेदवाराची निवड लेखी आणि मेडिकल टेस्टच्या आधारावर केली जाईल.