बहुजननामा ऑनलाइन टीम – प्रेमप्रकरणात विरोध करुन प्रेयसीला भेटू न देणार्या आजी व तिच्या नातवाचा चाकूने गळा कापून हत्या करण्याचा प्रकार नागपूरात उघडकीस आला आहे. त्यानंतर या संशयिताने मलकापूर रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेखाली उडी मारुन रात्री आत्महत्या (lover commits suicide)केली. या दुहेरी हत्याकांड व आरोपीच्या आत्महत्येच्या प्रकाराने नागपूर हादरले.
यश यांच्या बहिणीबरोबर १७ वर्षाच्या आरोपीचे प्रेम प्रकरण होते. आजी लक्ष्मीबाई यांचा या प्रेमप्रकरणाला विरोध होता. त्या या दोघांना भेटू देत नव्हती. यश धुर्वे याचे आईवडिल घराबाहेर गेल्यानंतर दुपारी आरोपी त्यांच्या घरात शिरला व त्याने लक्ष्मीबाई यांचा गळा कापून त्यांची हत्या केली. यावेळी घरात यश ही होता. त्याच्यावरही वार करुन त्याने त्याची हत्या केली़ त्यानंतर तो पळून गेला होता.
घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यावरुन पोलीस संशयित आरोपीचा शोध घेत होते. त्यातच आज सकाळी मलकापूर येथील रेल्वे मार्गावर एका धावत्या रेल्वेखाली उडी मारुन एकाने आत्महत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याची खात्री केली तेव्हा दुहेरी हत्याकांड केलेल्या आरोपीचा तो मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.