पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Lonavla News | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटन स्थळी 144 कलम लागू (Lonavla Section 144) करण्यात आले आहे. लोणावळ्यामध्ये 144 कलम लागू (Lonavla Section 144) केल्यामुळे पाच किंवा त्या पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याशिवाय धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून लोणावळ्यातील पर्यटनस्थळी (Lonavla tourist destination) नागरिकांनी गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले होते. पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वारंवार आवाहन करुन दखील नागरिक गर्दी करत होते. त्यामुळे आजपासून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. Lonavla News | lockdown extended restrictions in lonavla section 144 curfew ajit pawar
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, पालकमंत्री अजित पवार यांनी येत्या आठवड्यातही पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) मध्ये निर्बंध कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
तसेच पुणे जिल्ह्यात मागील आठवड्यातील नियम कायम ठेवण्यात आले आहेत.
त्यामुळे येत्या आठवड्यात देखील पुण्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असणार आहे.
शनिवार, रविवार विकेंडला अत्यावश्यक सुविधा वगळता कडक निर्बंध लागू राहणार आहेत.
तसेच पर्यटनस्थळं देखील बंद राहणार आहेत.
या पर्यटन स्थळांवर नियम लागू
भुशी डॅम (Bhushi Dam), घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉईंट, मंकी पॉइंट (Monkey Point), अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, एकविरा मंदिर परिसर, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोना किल्ला, पवना धरण परिसर, भाजे धबधबा, धबधबे आणि धर या ठिकाणी एक किलोमीटरपर्यंतच्या परिसरात हे नियम लागू राहतील.
Web Title : Lonavla News | lockdown extended restrictions in lonavla section 144 curfew ajit pawar
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update