नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोनाचा हैदोस सुरुच असून नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, कोरोनामुळे अनेक बड्या हस्तींपासून सेलिबृेटीना मृत्यूने गाठले आहे. कोरोनामुळे लोकपाल समितीचे सदस्य आणि निवृत्त न्यायाधीश एके त्रिपाठी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना 02 एप्रिलला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांना दिल्लीतल्या एम्समध्ये भरती करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
देशाच्या अतिशय महत्त्वाच्या लोकपाल समितीच्या चार सदस्यांपैकी ते एक होते. बिहारचे अतिरिक्त महाधिवक्ते आणि नंतर ते पाटना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले होते. 23 मार्चलाच त्यांची लोकपालचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. कोरोनाचे थैमान दिवसेंदिवस वाढतच असून जगातल्या इतर देशांपेक्षा भारतात कोरोनाचा उद्रेक नियंत्रणात असला तरी संख्येत दररोज वाढ होत आहे. कोरोबाधितांची संख्या आता 38 हजार 776 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 1 हजार 223 वर गेला आहे. जगात आत्तापर्यंत 32 लाख लोक बाधित असून 2 लाख 28 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.
एनपी न्यूज24 नेटवर्क