नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आतापर्यंत लोकांची अशी तक्रार होती की, एलआयसी महाग ऑफर देत असते. हाच ट्रेंड बदलण्यासाठी भारतीय विमा महामंडळ (LIC)ने एक स्वस्त ट्रॅडिशनल आणि प्युअर प्रोटक्शन टर्म इंशुरन्स प्लॅन जीवन अमर लाँच केला आहे. LIC ने दिलेल्या माहितीनुसार, जीवन अमर प्लॅनमध्ये दोन डेथ बेनिफिट्स ऑपशन्स मिळतात. यातील लेवल सम अॅश्योर्ड आणि इंक्रिजिंग सम अॅश्योर्ड पैकी एक सुविधा तुम्ही निवडू शकता.
एलआयसीचा हा प्लॅन पूर्वीचा टर्म प्लॅन अमूल्य जीवनपेक्षा स्वस्त आहे. एलआयसीने अमूल्य जीवन टर्म प्लॅन परत घेतला आहे. एलआयसीचा जीवन अमर हा प्लॅन स्वस्त तर आहेच परंतु यातील आणखी काही फीचर्समुळे तो अजूनच खास बनतो.
1) 10 वर्षांपासून ते 40 वर्षांपर्यंतची पॉलिसी टर्म
एलआयसीचा जीवन अमर प्लॅन 18-65 वयोगटातील लोकांसाठी तयार केला गेला आहे. यानुसार मॅक्सिमम एज मॅच्युरिटी 80 वर्षे आहे. जीवन अमरनुसार, पॉलिसी टर्म 10 वर्षांपासून 40 वर्षांपर्यंत असणार आहे.
2) प्रीमियम पे करण्यासाठी मिळणार हे पर्याय
एलआयसीच्या जीवन अमर प्लॅनमध्ये प्रीमियम देण्यासाठी तीन पर्याय मिळणार आहेत. सिंगल प्रीमियम, रेग्युलर प्रीमियम आणि लिमिटेड प्रीमियम. लिमिटेड प्रीमियममध्ये दोन पर्याय प्रीमियम पेइंग टर्म(PPT), पॉलिसी टर्म 5 वर्षांपेक्षा कमी आणि दुसरा पॉलिसी टर्म 10 वर्षांपेक्षा कमी आहे. प्रीमियम अदा करण्याचे अधिकतर वय 70 वर्षे असणार आहे. रेग्युलर आणि लिमिटेड प्रीमियम पर्यायामध्ये किमान प्रीमियम हप्ता 3000 रुपये असेल. सिंगल प्रीमियम पर्यायात किमान प्रीमियम हप्ता हा 30,000 रुपये ठेवला गेला आहे.
3) महिलांना कमी पैसे खर्च करावे लागतील
रेग्युलर प्रीमियम पर्यायात कोणतीही सरेंडर व्हॅल्यू मिळणार नाही. परंतु हा सिंगल प्रीमियममध्ये उपलब्ध असेल. लिमिटेड प्रीमियम पर्यायात नियम आणि अटी लागू असतील. पुरुष आणि महिलेसाठी प्रीमियमची रक्कम वेगळी असणार आहे.
4) धुम्रपान न करणाऱ्यांसाठी कमी प्रीमियम
धुम्रपान करणारे आणि न करणाऱ्यांसाठी असणाऱ्या प्रीमियममध्ये फरक असणार आहे. पुरुषांचा प्रीमियम महिलेहून अधिक असणार आहे. जे धुम्रपान करतात त्यांना जास्त प्रीमियम अदा करावा लागेल.