मुंबई :बहुजननामा ऑनलाइन – Legislative Council elections | विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुकीचे (Legislative Council elections) बिगुल वाजले आहे. येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेनेकडून (Shiv Sena) उमेदवार कोण द्यावा याबाबत नावांची चर्चा सुरू आहे. मुंबई येथील शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांची रिक्त जागा होणार आहे. या जागेवर शिवसेनेकडून अनेक नावांची चाचपणी सुरू आहे.
मुंबईच्या रिक्त होणा-या जागेवर शिवसेनेतून वरळीचे माजी आमदार सुनील शिंदे (Sunil Shinde), शिवसेना उपनेते व माजी राज्यमंत्री सचिन अहिर (Sachin Ahir),
युवासेना सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai), मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar), शिवसेना सचिव सुरज चव्हाण
(Secretary Suraj Chavan), यांच्या नावांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, रामदास कदम यांना आता परत संधी मिळणार नाही.
शिवसेनेत नव्या व्यक्तीला उभं करण्याचा विचार आहे.
यापूर्वी आमदारकी, मंत्रीपदे भूषवलेल्यांना परत आता संधी मिळणार नसल्याची माहिती सूत्रांकडून येत आहे. (Legislative Council Elections)
2014 ते 2019 साली वरळीचे आमदार म्हणून नेतृत्व करणारे माजी आमदार सुनील शिंदे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)
यांच्यासाठी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आपली जागा रिक्त केली होती.
त्यामुळे शिवसेनेतून विधानसभेच्या मुंबईच्या जागेवर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
राष्ट्रवादीतून 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेले माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या नावाची देखील चर्चा सुरूय.
तसेच, आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ असलेले वरुण सरदेसाई यांचेही नाव वर आहे.
त्याचबरोबर महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.
Web Title : Legislative Council Elections | Shiv Sena names Sachin Ahir, Varun Sardesai, Sunil Shinde and Kishori Pednekar’s name in the lead for Legislative Council elections.
Gold Price Today | सोन्याच्या दरात तेजी, चांदीच्या भावात कमालीची वाढ; जाणून घ्या आजचे नवीन दर
Crime News | आमदाराच्या 16 वर्षाच्या मुलाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या, प्रचंड खळबळ