पुणे बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीतून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या लक्ष्मण माने यांनी महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी नावाचा पक्ष स्थापन केल्याचे जाहीर केले. राज्यातील डाव्या पक्षांसह आघाडी करत आपला पक्ष काम करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कॅम्पमधील अरोर टॉवरमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली आहे.
यावेळी जनता दल (सेक्यूलर)चे महासचिव निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटीलदेखील उपस्थित होते. येत्या २९ जूलै रोजी बालगंधर्व रंगमंदिरात पक्षाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती लक्ष्मण माने यांनी दिली.
विधानसभा निवडणूकीत जागावाटपासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी क़ॉंग्रेस पक्षासोबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच शेकाप, स्वाभीमानी शेतकरी संघटना, सीपीआय, सीपीएम, संभाजी ब्रिगेड आपल्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.