बहुजननामा ऑनलाइन टीम – स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने आपला नवीन फ्लैगशिप स्मार्टफोन बाजारात आणला आहे. हा स्मार्टफोन Xiaomi ने mi ११ नावाने लॉन्च केला आहे. गेल्या काही काळापासून या स्मार्टफोनबद्दल चर्चा(smartphone Mi 11) होती. चर्चेत येण्याचे कारण म्हणजे या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये. यात कंपनीने १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तसेच mi ११ ला कंपनीने Qualcomm च्या फ्लैगशिप चिपसेट Snapdragon ८८८ SoC द्वारे लाँच केले गेले आहे. या स्मार्टफोनच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल आणि किंमतीबद्दल जाणून घ्या.
mi ११ची किंमत
Xiaomi ने mi ११ स्मार्टफोन ३ जी ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम + २५६जीबी स्टोरेज आणि ११ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट म्हणजेच ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज मॉडेल ३,९९९ सीएनवाय (अंदाजे ४४,९९९ रुपये) किंमतीने लाँच झाला आहे. त्याचबरोबर त्याचे अन्य वेरिएंट ८जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजची किंमत ४, २९९ सीएनवाय (सुमारे ४८,३०० रुपये) ठेवण्यात आली आहे. त्याचा टॉप व्हेरिएंट १२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज ४,६०० सीएनवाय (अंदाजे ५२,८००रुपये) च्या किंमतीवर उपलब्ध असेल. चीनमध्ये या स्मार्टफोनची विक्री १ जानेवारी २०२१ पासून सुरू होईल.
वैशिष्ट्ये
Xiaomi mi ११ स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी तर यात ६.८१ इंचाचा AMOLED 2K क्वाड कर्वड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये Qualcomm ची फ्लैगशिप चिपसेट Snapdragon 888 SoC आहे. mi ११ Android ११ वर आधारित Xiaomiच्या होन यूआय एमआययूआय १२.५ वर चालतो. हा स्मार्टफोन तीन प्रकारांमध्ये दाखल करण्यात आला आहे.
या स्मार्टफोनच्या कॅमेरा वैशिष्ट्यांविषयी
यात ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप आहे. यात १०८ एमपीचा प्राइमरी कॅमेरा आहे, जो ओआयएस (ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन)सपोर्ट केला आहे. दुसरा कॅमेरा १३ एमपी वाइड एंगल लेन्सचा आहे. याशिवाय Xiaomiच्या या स्मार्टफोनमध्ये ५ एमपी मॅक्रो सेन्सरसुद्धा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी ‘पंच होल’ कॅमेरा आहे.
इतर
या स्मार्टफोनच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलताना mi ११ स्मार्टफोनला चार्जिंग करण्यासाठी यात ४६०० एमएएच बॅटरी आहे, जी ५५ डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. यासह हा स्मार्टफोन ५० डब्ल्यू वायरलेस चार्जिंग आणि १० डब्ल्यू रिव्हर्स चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे. सुरक्षेसाठी स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.