लक्षद्वीप : वृत्तसंस्था – लक्षद्वीपमध्ये भाजपच्या (Lakshadweep BJP) 15 नेते आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. आयशा सुल्ताना विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याने नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा देण्याचे पाऊल उचललं आहे. फिल्ममेकर आयशा सुल्ताना विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर भाजप नेत्यांमध्ये दुफळी निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे.
High Caffeine Side Effects | कॉफी आवडते का, मग व्हा सावध ! जास्त कॅफीनमुळे जाऊ शकते डोळ्यांची दृष्टी
लक्षद्वीप भाजप अध्यक्ष सी अब्दुल खादर हाजी यांनी आयशा सुल्तानाविरोधात राजद्रोहाची तक्रार दिली आहे. त्या तक्रारीनंतर तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात एका वृत्तसंस्थेने वृत्तं दिलं आहे.
काय आहे प्रकरण ?
शुक्रवारी लक्षद्वीपची पहिली महिला फिल्मेकर आयशा सुल्तानावर कावारत्ती पोलीस ठाण्यात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका टीव्ही शोमधील चर्चेदरम्यान आयशा सुल्ताना यांनी लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे निर्णय आणि कोरोना रुग्णांची वाढती संख्ये वरुन टीका केली होती.
एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, भाजपचे राज्य सचिव अब्दुल हामिद यांनी सांगितले की, आपल्या चेतलाथच्या बहिणीविरोधात खोटी आणि अयोग्य तक्रार दाखल केली आहे. यावर आमचा आक्षेप आहे. म्हणून आम्ही आमचा राजीनामा देत आहोत.
Web Titel : Lakshadweep BJP sedition case filed against filmmaker aisha sultana after 15 lakshadweep bjp members resign
केरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक बॅगेजमधून दुबईतून आणले होते ‘सोने’
रमेश गिरी यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड; पाथरी येथे समाज बांधवांच्या वतीने सत्कार