पुणे : बहुजननामा ऑनलाईन – दारु विक्रीचा बनावट परवाना देऊन एका तरुणीने मित्राच्या मदतीने तब्बल ४० लाख ४३ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी (Pune News) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Lakshadweep BJP | भाजपला मोठं खिंडार, एकाचवेळी 15 भाजप नेत्यांचा पक्षाला रामराम
शुभम दुर्गेश गौर (वय ३३) आणि रुजना गौर (वय २६, रा. फुरसुंगी) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत कोथरुडमधील हॅपी कॉलनीत राहणार्या ३३ वर्षाच्या तरुणाने शिवाजीनगर पोलिसांकडे (Pune News) फिर्याद दिली आहे. हा प्रकार १८ जानेवारी ते १९ सप्टेंबर २०२० दरम्यान शिवाजीनगर न्यायालय व इतरत्र झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुजना गौर हिने शुभम गौर हा दिल्लीतील एन सी टी येथे सहायक आयुक्त या सरकारी पदावर काम करत असल्याचे खोटे सांगितले. बनावट आयकार्ड दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला.
रमेश गिरी यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड; पाथरी येथे समाज बांधवांच्या वतीने सत्कार
त्यांनी प्रथम हडपसर येथे नवीन फ्लॅट घेतला. त्यासाठी आम्हाला पैशांची आवश्यकता आहे, असे सांगून शिवाजीनगर न्यायालयात समजूतीचा करारनामा करुन फिर्यादीशी जवळीक साधून विश्वास संपादन केला.
त्यानंतर फिर्यादीकडून वेळोवेळी रोखीने व ऑनलाईनद्वारे पैसे घेतले.
तसेच फिर्यादीच्या मित्रांकडून ४० लाख ४३ हजार रुपये घेतले.
त्या मोबदल्यात फिर्यादीला मेसर्स सयुरी वाईन्स अँड कंपनी नावाचे दारु विक्री परवाना देतो, असे सांगितले.
High Caffeine Side Effects | कॉफी आवडते का, मग व्हा सावध ! जास्त कॅफीनमुळे जाऊ शकते डोळ्यांची दृष्टी
बनावट दारु विक्री परवान्याची कलर झेरॉक्स व वाईन बार लायसन्स कलर झेरॉक्स देऊन पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली.
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मुंढे अधिक तपास करीत आहेत.
Web Titel : Pune News In Pune a young woman betrayed by getting close Fraud of Rs 40 lakh by issuing fake liquor license
केरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक बॅगेजमधून दुबईतून आणले होते ‘सोने’
भाड्याने दिलेली कार घेऊन तिघे फरार; मासिक भाड्याबरोबर गाडी गेली हातची