चामोर्शी : बहुजननामा ऑनलाईन – तालुका कुणबी समाज संघटना चामोर्शीच्या वतीने जगद्गुरू श्री तुकोबाराय महाराज सदेह वैकुंठ गमन सोहळा (बीज उत्सव) स्थानिक साधुबाबा कुटीतील हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सकाळी ९ ते ११ वाजतापर्यंत पालखी सोहळा (दिंडी), दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत मार्गदर्शन सोहळा झाला. दुपारी१ वाजता हभप धनराज महाराज नागापुरे यांच्या उपस्थितीत सदेह वैकुंठ गमन किर्तन व यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर म्हशाखेत्री, मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. विठ्ठल चौथाले, डॉ. देवेंद्र मुनघाटे, संघटनेच तालुकाध्यक्ष बाळू दहेलकर, आनंदराव लोंढे, नामदेव किनेकार, सुदर्शन रोहनकार, उमाकांत चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका कुणबी समाज संघटना व शहर कुणबी समाज संघटना चामोर्शी यांनी विशेष परिश्रम घेतले.