लातूर : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र निराधार देवदासी संघटना व दुर्बल घटक आघाडीच्या वतीने निराधार, विधवा, परितक्ता, देवदासी महिलांचा मेळावा शहरात नुकताच संपन्न झाला. दुर्बल घटक आघाडीचे नेते विलास रुपवते यांच्या उपस्थितीत भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात पार पडलेल्या या मेळाव्यास जिल्हाभरातील शेकडो महिलांची उपस्थिती होती. यावेळी, अरुण गायकवाड, रवि लोंढे, संतोष चव्हाण, बाबूराव गव्हाणे, सोनेराव जाधव, बाळासाहेब लोंढे, सविताबाई कांबळे, सखुबाई वाघमारे, सीमाबाई मोटे, फुलाबाई झुंजे आदींची उपस्थिती होती.