नवी दिल्ली : वृत्तसंस्था : देशातील टेलिकॉम सेक्टर (Telecom Sector) मधील संकटाचा परिणाम आता प्रोमोटर्स वर देखील पाहावयास मिळत आहे. वोडाफोन ग्रुप पीएलसी (Vodafone Group Plc.) मध्ये उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला हे दुसऱ्या नंबरचे सर्वात मोठे गुंतवणूकदार आहेत. परंतु टेलिकॉम सेक्टरवरील संकटामुळे त्यांच्या एकूण संपत्तीत जवळपास ३ अरब डॉलर ची घसरण झाली आहे. २०१७ नंतर आत्तापर्यंत कुमार मंगलम बिर्ला यांच्या संपत्तीत एक तृतीयांश इतकी घट झाली आहे. तसेच केमिकल्स, मेटल आणि सीमेंट च्या क्षेत्रात देखील त्यांच्या अन्य कंपनीच्या शेअर मध्ये घसरण झाली आहे, ज्याचा परिणाम त्यांच्या एकूण संपत्तीवर पडला आहे.
बिर्लाची संपत्ती दोन वर्षांनी घटली- ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्स (Bloomberg Billionaire Index) च्या अनुसार, मागील दोन वर्षात बिर्लाचे नेटवर्थ (K M Birla Networth) ९.१ अरब डॉलर ने घटून ६ अरब डॉलर इतके राहिले. त्यांच्या संपत्तीचा एक मोठा हिस्सा आदित्य बिर्ला ग्रुप (Aditya Birla Group) कडून येतो जे कि त्यांची प्रमुख होल्डिंग्स आहे. मागील आठवड्यातच वोडाफोन आइडिया (Vodafone Idea) ने सप्टेंबर तिमाही चा परिणाम प्रसारित केला. त्यात कंपनीला मोठे नुकसान झाले आहे.
हिंडाल्कोच्या नफ्यात घसरण- याव्यतिरिक्त आदित्य बिर्ला ग्रुप ची हिस्सेदारी जगातील सर्वात मोठी एल्युमिनियम रोलिंग कंपनी मध्ये देखील आहे. एल्युमिनियम आणि कॉपर बनवणारी हिंडाल्को (Hindalco) चा नफा सप्टेंबर तिमाही मध्ये ३३ टक्क्यांनी घसरला आहे.
सप्टेंबर २०१७ नंतर हिंडाल्को च्या शेअर मध्ये आतापर्यंत ३१ टक्क्याची घसरण आली आहे, त्यात कंपनीच्या मार्केट वैल्यू (Hindalco Market Value) मध्ये 5.9 अरब डॉलर ची कमतरता आली असून या दरम्यान सेंसेक्स (BSE Sensex) मध्ये १९ टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली.
ग्रासिम इंडस्ट्रीज वरही दबाव- भारतात देखील आर्थिक सुस्ती (Economic Slowdown) च्या कारणामुळे सिमेंटपासून केमिकल्स आणि टेक्सटाइल्स च्या मागणीत घसरण दिसून आली आहे.
ग्रासिम इंडस्ट्रीज (Grasim Industries) मधेही त्यांची हिस्सेदारी आहे. वोडाफोन आइडिया सारखा परिणाम ग्रासिम इंडस्ट्रीज वर देखील झाला असून त्यात १२ टक्क्यांची भागीदारी आहे.
दोन्ही बाजूंनी झटका- चीन आणि अमेरिका यांत चालू असलेले ट्रेड वॉर (Trade War) आणि वैश्विक आर्थिक सुस्ती (Global Slowdown) मुळे इंडस्ट्रीज मधून निघणारा कच्च्या मालाची मागणी कमी झाली आहे. या काळातच टेलिकॉम सेक्टरच्या संकटाने बिर्लास एक मोठा झटका दिला आहे. दरम्यान मागील आठवड्यात वोडाफोनच्या शेअर मध्ये थोडीशी वाढ झाल्याने कंपनीस थोडा दिलासा मिळाला आहे.
वोडाफोन आइडिया वर कर्जाचा डोंगर- मागील महिन्यातच सुप्रीम कोर्टाने वोडाफोन आइडिया ला ४ अरब डॉलरची थकबाकी सरकारला चुकविण्याचा आदेश दिला आहे.
कंपनीवर आधीपासूनच १४ अरब डॉलर चे कर्ज आहे. २०१७ नंतर वोडाफोन आयडिया च्या शेअरांमध्ये ९० टक्क्यांनी घसरण झाली असून, त्यानंतर कंपनीची मार्केट वैल्यू कमी होऊन २.७ अरब डॉलर इतकी झाली आहे.