मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या भूमिकेने पक्षात फूट पडली असल्याचं राष्ट्रवादीने स्वीकारलं आहे. अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, अशा आशयाचं ट्विट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होत. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील पक्ष आणि घरात फूट पडल्याची भावना व्यक्त केली आहे.
अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही.
हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 23, 2019
तीन पक्षाची आघाडी करण्याच्या गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या हालचालींना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी धक्का देत भाजपला अचानकपणे पाठिंबा दिला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या या निर्णयाशी सुप्रिया सुळे व शरद पवार सहमत नाहीत. सुप्रिया सुळे यांनी party and Family Split असं व्हाट्सअॅप स्टेट्स ठेवलं आहे.
Supriya Sule, Senior NCP leader and daughter of Sharad Pawar's latest Whatsapp status,her office confirms statement as well pic.twitter.com/cRksZyrNJK
— ANI (@ANI) November 23, 2019
याशिवाय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट केले. अजित पवारांचा हा निर्णय वैयक्तीक असून या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठींबा नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यांचे हे ट्विटही सुप्रिया सुळे यांनी रिट्विट केले आहे.
Visit : bahujannama.com