कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडाणुका तोंडावर येत आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत पश्चिम महाराष्ट्रातही राष्ट्रादीला मोठं भगदाड पडलं आहे. यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
कोल्हापूरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी पक्षाकडून दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला आहे. आवाडे यांनी जिल्हाध्यक्ष पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये काँग्रेस पक्षाला भगदाड पडलं आहे. 6 महिन्यांपूर्वीच आवाडे यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारली होती. त्यांनी पक्षाच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष लढण्याचे किंवा शिवसेनेत जाण्याचे संकेतही दिले आहेत.
प्रकाश आवाडे म्हणाले की, “संपूर्ण राज्यात काँग्रेस पक्षावर नाराजीचा सूर आहे. काँग्रेसने कोल्हापूर जिल्ह्यात आमच्यासोबत दुजाभाव केला. त्यामुळे मला पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. आगामी विधानसभा अपक्ष लढू तसेच आगामी 2 दिवसांतच शिवसेना प्रवेशाबाबतची भूमिका स्पष्ट करू.”
पुढे आवाडे म्हणाले की, “मी काँग्रेस पक्षात एकनिष्ठपणे काम केलं. परंतु आवाडे गटाला आजपर्यंत काँग्रेसने दुजाभाव दिला. कलम 370 मध्ये बदल केल्यानंतर काही काँग्रेस नेत्यांनी याला विरोध केला. आपण ज्या देशात राहतो त्या देशासोबत राहायचं सोडून काँग्रेसने कलम 370च्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.”
वयाच्या पंचेचाळिशीत मलायका कशी आहे फिट, जाणून घ्या तिचा ‘डाएट प्लॅन’
फालूदा आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
द्राक्षांची कुल्फी : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
अद्रकाचे ‘हे’ घरगुती उपाय माहिती नसतील तुम्हाला, अवश्य ट्राय करा
व्हॅनिला आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
लावा टोमॅटो पेस्ट, कोंडा काही दिवसांतच होईल दूर
टरबूज आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी