बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या आगामी सिनेमामुळं चर्चेत आला आहे. शाहरुख खानचे त्याच्या पठाण (Pathan) सिनेमाच्या सेटवरील अनेक फोटो आणि व्हिडीओही अनेकदा समोर आले आहेत जे व्हायरल झाले आहेत. या सिनेमात दीपिका पादुकोण लिड रोलमध्ये दिसणार आहे. अशातच आता अशी माहिती समोर येत आहे की, या सिनेमात सलमान खानही झळकणार आहे. सध्या दुबईत सिनेमाची शुटींग सुरू आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पठाण सिनेमासाठी दोन्ही खान जवळपास 15 दिवसांपर्यंत शुटींग करणार आहेत. सलमान आणि शाहरुख एकत्र काम करण्याला घेऊन खूप खुश आहेत. या सिनेमात सलमान खान स्पेशल अपीरंस मध्ये जासूस टायगरच्या अवतारात दिसणार आहे.
याआधीही सलमान खाननं शाहरुखच्या झिरो सिनेमात कॅमिओ रोल केला आहे. तर 2017 साली आलेल्या सलमानच्या ट्युबलाईट या सिनेमात शाहरुखनं स्पेशल अपीरंस दिला होता.
पठाण सिनेमा 2021 मध्ये रिलीज करण्याचं ध्येय आहे. या सिनेमात दीपिका पादुकोण खुफिया एंजटची भूमिका साकारणार आहे. जॉन अब्राहम या सिनेमात निगेटीव्ह रोल करताना दिसणार आहे.
शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर असं बोललं जात आहे की राजकुमार हिरानी यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वर्षभरापासून तो मोठ्या पडद्यापासून लांब आहे. 2018 मध्ये तो झिरो सिनेमात शेवटचा दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. आता लवकरच तो पठाण मध्ये दिसणार आहे. या सिनेमात त्याच्या सोबत दीपिका पादुकोण दिसणार आहे. याआधीही ही जोडी ओम शांती ओम, चेन्नई एक्सप्रेस, हॅप्पी न्यू ईयर अशा सिनेमात सोबत दिसली आहे.
सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे युअर मोस्ट वॉन्टेड भाई या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभु देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळं ते शक्य झालं नाही. आता 2021 च्या ईदला हा सिनेमा रिलीज होणार आहे. याशिवाय सलमान अंतिम आणि शाहरुख खानच्या पठाण सिनेमातही दिसणार आहे. इतकंच नाही तर तो किक 2 आणि कभी ईद कभी दिवाली सिनेमातही काम करणार आहे.