बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : नॅशनल पेन्शन सिस्टिम (NPS) आणि अटल पेन्शन योजनेसाठी (APY) यापूर्वी कागदपत्रांची गरज होती. मात्र, आता सरकारने याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, e-KYC साठी मंजूरी देण्यात आली आहे.
सरकारच्या या नव्या योजनेमुळे तुम्हाला कागदपत्रांची गरज भासणार नाही आणि तुमचे अकाऊंट डिजिटल स्वरूपात उघडेल. याबाबत ‘पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलप्टमेंट ऍथोरीटी’ (PFRDA) ने सांगितले, की NPS आणि APY ने e-KYC सर्व्हिस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महसूल विभागाकडून मंजूरीही मिळाली आहे.
NPS, APY मध्ये e-KYC
PFRDA ने सांगितले, की ऑनलाईन e-KYC च्या माध्यमातून NPS साठी खाते उघडणे आणखीच सोपं होईल. NPS आणि अटल पेन्शन योजना PFRDA च्या दोन फ्लॅगशिप योजना आहेत. यामध्ये NPS ही योजना संघटित क्षेत्रासाठी तर APY योजनेचा फायदा असंघटित क्षेत्रातील लोकांना होत असतो.
NPS, APY मध्ये अनेक सेवा पेपरलेस
PFRDA ने सांगितले, की Entry to Exit किट सबस्क्रायबर्सना दिले जाते. PFRDA ने योजनेत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या NPS सबस्क्रायर्ससाठी पूर्ण बदल केला गेला आहे. अनेक सर्व्हिसेस खूपच सोपी आणि पेपरलेस झाल्या आहेत.
अनेक सेवा डिजिटल
सध्या अनेक सेवा डिजिटल केल्या आहेत. यामध्ये OTP आधारित ऑथेंटिकेशन, पेपरलेस ऑन बोर्डिंग, ई-साईन आधारित ऑथेंटिकेशन आणि व्हिडिओ कस्टमर आयडेंटिफिकेशन यामुळे लांब असलेल्या लोकांना योजनेशी निवडीत सुविधा मिळू शकतात, अशी माहिती PFRDA ने दिली.