नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर कोरियाचे किम जोंग यांनी त्यांच्या संस्था नवीन प्रकारच्या शस्त्रावर काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच त्यांनी गेल्या वर्षी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या भेटीत उत्तर कोरिया आपले आण्विक प्रोग्रॅम बंद करणार असल्याचे सांगितले होते. परंतु बदलत्या वर्षासह धोरणांमध्ये बदल करून नव्या प्रकारे काम करणार असल्याचे सांगितले.
एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, किम जोंग यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांसह बैठकीत अमेरिकेशी असलेल्या संबंधांवर चर्चा केली. उत्तर कोरियाने अणुप्रक्रियेवर बोलण्याचे आवाहन केले असून अमेरिका अजूनही प्रतिसाद देत नाही. अमेरिका आमच्यासोबत गुंडगिरीसारखे व्यवहार करत असून ते म्हणतील तसे आम्ही काम करावे, असे त्यांचे म्हणणे आहे, असे विधान किम जोंग यांनी केले होते. तसेच जग आता आमच्या नवीन शस्त्रांचा कार्यक्रम पाहणार असून तो क्षण ऐतिहासिक असणार आहे.
किम जोंग यांच्या विधानावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड तरूप यांनी प्रतिक्रिया देत ते आपले शब्द पाळणारे माणूस आहेत. अशातच त्यांनी अण्वस्त्रे सोडण्याचे सांगितले असून ते तसच करतील असे वाटत आहे, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प असेही म्हणाले की, उत्तर कोरिया आपल्या रणनीतीनुसारच पुढे जाईल. तेव्हा आपण तेच करू जे आपल्याला करायचे आहे. तसेच ट्रम्प यांनी त्यांच्या सिंगापूरमधील भेटीची आठवण करून देताना दोन देशांमध्ये करार ठरले आहेत, ते किम जोंग यांना नक्कीच आठवणीत असतील, असे ट्रम्प म्हणाले.
Visit : bahujannama.com