बहुजननामा ऑनलाइन टीम –बॉलिवूड स्टार कियारा आडवाणी (Kiara Advani) आपल्या अॅक्टींग सोबतच फॅशन आणि स्टाईलसाठीही फेमस आहे. 2014 साली कियारानं(Kiara Advani) बॉलिवूड डेब्यू केला होता. आता ती बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करिअरच्या काही काळातच तिनं खूप पॉप्युलॅरिटी मिळवली आहे. आता कियारानं तिला तिच्या परफेक्ट मॅनमध्ये काय गुण हवेत हे सांगितलं आहे. एका चॅट शोमध्ये तिनं याबाबत सांगितलं आहे. तशी तिची लिस्ट खूप मोठी आहे. तिनं सांगितलं की तिला हृतिक रोशन, अक्षय कुमार, फरहान अख्तर आणि आयुष्मान खुराना यांचं मिश्रण असलेला पार्टनर हवा आहे.
पार्टनरमधील गुण सांगताना कियारा म्हणाली, “त्याच्या जेनिफर लॉरेन्ससारखा हजरजबाबीपणा असला पाहिजे. तो दिसायला हृतिक रोशनसारखा (Hrithik Roshan) असावा आणि त्याचा डिसिप्लीन-स्टॅमिना अक्षय कुमार सारखा (Akshay Kumar) असावा.” इतकंच नाही तर कियारानं आणखीही अनेक गोष्टी सांगितल्या.
अंबानीएवढा पैसा असावा
कियारा असंही म्हणाली, तिचा पार्टननर श्रीमंत असावा. नुसताच श्रीमंत नसावा तर त्याच्याकडे अंबानी (Ambani) एवढा पैसा असावा. सोबतच फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) सारखं टॅलेंटही त्याच्यात असावं.
कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर गुडन्यूजनंतर आता तिच्यकडे अनेक सिनेमे आहेत. कियारा लक्ष्मी बॉम्ब, इंदू की जवानी, भूल भूलैया 2 आणि शेरशाह अशा अनेक मोठ्या सिनेमात काम करताना दिसणार आहे. गुड न्यूजंतर कियारा आणि अक्षय कुमार लक्ष्मी बॉम्ब सिनेमात पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.