खडकवासला : बहुजननामा ऑनलाइन – Khadakwasla Dam |गेल्या काही दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाचे पुन्हा एकदा आगमन झाले आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. खडकवासला धरण (Khadakwasla Dam) परिक्षेत्रात यंदा जून महिन्यात २०९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जून महिन्यातील पावसाचा विचार करता गेल्या २६ वर्षांत जून महिन्यात पडलेल्या पावसाच्या क्रमवारीत यंदाचा पाऊस अकराव्या स्थानावर असल्याचे समोर आले आहे.
अरबी समुद्रा(Arabian Sea)तील वाऱ्याच्या परिस्थितीमुळे पाऊस येण्याची वेळ मागे पुढे होत असली तरी मान्सून साधारणत ७ जूनला सुरु होत असतो. तर एक जून पासून पाटबंधारे विभागा(Department of Irrigation)कडे पाऊस पडल्याची नोंद होत असते. थोडक्यात पावसाचे नवीन वर्ष १ जून रोजी सुरु होते आणि ३१ मे रोजी संपते. खडकवासला (Khadakwasla Dam) पाटबंधारे विभागाकडे १९९६ पासून ते आजपर्यंत पडलेल्या पावसाच्या नोंदी आहेत. त्यानुसार १९९६ मध्ये जून महिन्यात खडकवासला धरणक्षेत्रात ३१९ मिलिमीटर पाऊस पडला होता. हा आजपर्यंतच्या २६ वर्षातील सर्वात जास्त पाऊस आहे.
त्यानंतर २००५ मध्ये ३१३ तर २०१५ मध्ये २९१ मिलिमीटर पाऊस पडला होता. तसेच, जून
महिन्यात सर्वात कमी पाऊस २००९ मध्ये फक्त २४ मिलिमीटर पडला होता. अशा प्रकारे २०१४
मध्ये २५, तर २०१२ मध्ये ३२ मिलिमीटर पाऊस पडला होता. येथील पावसाची सरासरी ७०५
मिलिमीटर असून यावर्षी जून महिनाअखेर २०९ म्हणजे २९.६४ टक्के पाऊस झाला आहे. दरवर्षी पानशेत धरणात दोन हजार मिलिमीटर पाऊस पडत असतो. यावर्षी ३० जूनअखेर ३७मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजे सरासरीच्या १८.९ टक्के पाऊस झाला आहे. वरसगाव धरणात दरर्षी दोन हजार १०० मिमी पाऊस पडत असतो. यंदा ३६६ मिमी पाऊस पडला असून तो सरासरीच्या १७.४२ टक्के आहे. टेमघर येथे तीन हजार ४३० मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा ५५५ मिलिमीटर पाऊस पडला असून सरासरीच्या १६.१८ टक्के इतका पाऊस झालेला आहे.
web title: Khadakwasla Dam | This year’s rainfall in June in Khadakwasala is eleventh ranking
Monsoon Update । राज्यात सर्वत्र पावसाची रिपरिप सुरु, चिंतेत असणाऱ्या बळीराजाला दिलासा
Mansoon Update | राज्यात मान्सूनचे दमदार आगमन; कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अलर्ट जारी