लखनौ :वृत्त संस्था – Kalyan Singh | उत्तर प्रदेश(Uttar Pradesh)चे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह (Kalyan Singh ) यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर येत असतानाच काही मिनिटांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. कल्याण सिंह (Kalyan Singh) यांच्यावर लखनऊच्या एसजीपीजीआय रुग्णालया(SGPGI Hospital)त उपचार सुरु आहेत. दरम्यान, गुरुवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. आज पंतप्रधान मोदी यांनी फोनवरुन त्यांच्या नातवाशी संपर्क साधून विचारपूस केली.
Kalyan Singh | pm modis phone call kalyan singhs grandson inquiries about treatment and health
https://twitter.com/
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याण सिंह यांच्या नातवाशी फोनवरुन संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटर अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी कल्याण सिंह लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थनाही केली आहे.
https://twitter.com/
मोदींकडून आठवणींना उजाळा
ट्विट(twitt)रवरुन माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कल्याण सिंह यांच्यासोबत माझ्या अनेक आठवणी आहेत. त्यांच्याशी संवाद साधणे म्हणजे नवीन शिकणे होय, आज त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. मी नुकतेच त्यांच्या नातवाशी फोनवरुन संवाद साधत कल्याण सिंह यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, असे मोदींनी म्हटले आहे. तसेच देशभरातून असंख्य प्रार्थना होत आहेत, असेही म्हणत मोदींनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.
‘क्रिटिकल केअर मेडिसिन’मध्ये उपचार सुरु
काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्यानंतर कल्याण सिंह यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, गंभीर स्थिती लक्षात घेता त्यांना एसपीजीआय रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. इथे ‘क्रिटिकल केअर मेडिसिन’ विभागाच्या आयसीयूमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी रात्री जेपी नड्डा विमानतळावरुन थेट एसजीपीजीआय रुग्णालयात कल्याण सिंह यांच्या भेटीसाठी गेले होते.
Web Title : Kalyan Singh | pm modis phone call kalyan singhs grandson inquiries about treatment and health
Khadakwasla Dam | खडकवासल्यातील जूनमधील यंदाचा पाऊस अकराव्या स्थानी
Monsoon Update । राज्यात सर्वत्र पावसाची रिपरिप सुरु, चिंतेत असणाऱ्या बळीराजाला दिलासा