मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Rain in maharashtra । मागील काही दिवसापासून पाऊस (Monsoon) गायब झाला होता. जुलै महिन्यात पावसाने ब्रेक घेतला होता. पावसाच्या न येण्याने बळीराजा चिंतेत होता. पावसाची रिपरिप नसल्याने तापमानात वाढ झाली होती. आता मात्र राज्यात सर्वत्र पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. सध्या पावसाने मुंबईसह कोकण, मराठवाडा आणि विदर्भा(Marathwada, Vidarbha)मध्ये पुन्हा पावसाचं आगमन झालं आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने हलक्या स्वरूपात हजेरी लावली आहे. राज्यात सर्वदूर पावसाच्या (Monsoon) आगमनाने चिंतेत असणाऱ्या बळीराजाला आता दिलासा मिळाला आहे.
आज 9 जुलैला कोकण (Konkan), गोवा (Goa), मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra), मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) अशा विविध ठिकाणी पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, 10 जुलै रोजीही या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार आणि मुसळधार देखील पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच, 11 जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस (Monsoon) होण्याची शक्यता हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभाग (Indian Meteorological Department), कुलाबा, मुंबई यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 9 ते 12 जुलै या कालावधीमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच, आठवडाभराच्या ब्रेकनंतर येथे 8 जुन रोजी (गुरुवारी) पावसाने (Monsoon) पुन्हा सुरुवात केली आहे. आता गडचिरोली जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात होणार आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर, चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेजचे सर्व 38 दरवाजे उघडले आहे. या दरम्यान, 10 जुलैपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात होणार असल्याचं हवामान विभागाने (Meteorological Department) सांगितलं आहे.
web title: Monsoon update rain started most places in maharashtra.
Mansoon Update | राज्यात मान्सूनचे दमदार आगमन; कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अलर्ट जारी