बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (katrina-kaif) कामावर परतली आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने आनंद व्यक्त केला. कतरिनाने इन्स्टाग्रामवर एक पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधला फोटो शेअर (Instagram-shares-pic-yellow-
अलीकडेच कतरिना एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. तिच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, कतरिना रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ मध्ये अक्षय कुमार सोबत दिसणार आहे. फोन भूत मध्ये इशान खट्टर आणि सिद्धार्थ चतुर्वेदीसोबत ती मुख्य भूमिकेत असणार आहे. कतरिना आणि इशान नोव्हेंबरमध्ये गोव्यासाठी रवाना होणार आहेत. गोव्यानंतर चित्रीकरण मुंबईत देखील होणार आहे.
अली अब्बास जफरच्या सुपरहीरो सीरिजमध्ये देखील ती झळकणार आहे. हा एक बिग बजेट सिनेमा आहे जो नेटफ्लिक्ससाठी तयार करण्यात येत आहे. यात कतरिना सुपरहिरोची भूमिका साकारणार आहे. 1987 मध्ये आलेला अनिल कपूर आणि श्रीदेवीचा सुपरहिट फिल्म मिस्टर इंडिया वर आधारित असेल.
सिनेमाचे बजेट खूप जास्त आहे आणि शूटिंग चार देशांमध्ये होणार आहे. एका दैनिकाच्या रिपोर्टनुसार अली अब्बास अलीकडेच म्हणाला की, सुपरहिरो सिनेमामधील काही सीन्ससाठी त्याने दुबई लोकेशन लॉक केले आहे. अलीने अबु धाबी आणि दुबईमधले काही लोकेशन्स बुक केले आहेत, जिथे सिनेमाची शूटिंग होणार आहे.