बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बिंधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. सोशलवर ती कायमच अॅक्टीव्ह असते. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर ती भाष्य करतच असते. अनेकदा ती वादातही सापडली आहे. बुधवारी तिचं ट्विटर अकाऊंट तात्पुरतं बंद (Kangana Ranaut’s Twitter)करण्यात आलं होतं. यानंतर कंगनानं ट्विटरचे सीईओ जॅक यांना टॅग करत त्या लोकांना जोरदार प्रत्युत्तर देखील दिलं आहे, ज्यांनी तिचं ट्विटर अकाऊंट बॅन करण्याची मागणी केली होती.
कंगनानं ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं लिबरल आता त्यांचे काका जॅककडे जाऊन रडू लागले आणि माझं अकाऊंट तात्पुरतं बंद केलं. ते लोक मला धमकी देत आहेत. माझं अकाऊंट/व्हर्च्युअल आयडेंटीटी कधीही देशासाठी शहिद होऊ शकते. माझं रिलोडेड देशभक्त व्हर्जन सिनेमातून परत येणार आहे. तुमचं जगणं मुश्किल करेन.
https://twitter.com/KanganaTeam/status/1351763172349382659?s=20
कंगनाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअर देखील केलं आहे. कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवी मध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.