नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सुरुवातीपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं समर्थन करत आहे. ती अनेकवेळा पीएम मोदींचं कौतुक करताना दिसते. तिने सोशल मीडियावर अनेक वेळा पोस्ट शेअर करून पंतप्रधान मोदींचा बलशाली व्यक्ती असा उल्लेख केला आहे. पुन्हा एकदा कंगनाने फोटो शेअर करत पीएम मोदींचं कौतुक केलं आहे.
कंगनाने पीएम मोदींशी हस्तांदोलन करतानाचा एक शानदार फोटो शेअर करत लिहिलं, ‘खरंच, जगातील सर्वात बलशाली व्यक्ती आणि तरी इतके नम्र.’ हे काय पहिल्यांदा नाही, कंगनाने अनेकवेळा मोदींचं कौतुक केलं आहे. पीएम मोदींप्रती असणारा आदर आणि समर्थन तिने तिच्या मुलाखतीतून देखील व्यक्त केलं होतं.
मागील काही दिवसात तिच्या या राजकारणाशी संबंधित पोस्ट वरून चर्चा सुरु होती की, कंगनाला राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा आहे. पण या अफवा असल्याचं सांगत कंगना म्हणाली होती की, अभिनय हेच तिचं पहिलं प्रेम आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1298217808111706112?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1298217808111706112%7Ctwgr%5E&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fentertainment%2Fbollywood-news%2Fstory%2Fkangana-ranaut-shares-photo-with-pm-modi-calls-him-the-most-powerful-man-on-earth-tmov-1119045-2020-08-25
तिने ट्विट करून लिहिलं होतं की, ‘ज्या लोकांना असं वाटतं की मला राजकारणात जाण्याची इच्छा आहे म्हणून मी मोदींचं समर्थन करते, तर त्यांना मी सांगू इच्छिते की माझे आजोबा 15 वर्षे काँग्रेसचे MLA होते. माझं कुटुंब आधीपासूनच राजकारणाशी जोडलेलं आहे आणि मला माझा सिनेमा ‘गँगस्टर’ नंतर प्रत्येक वर्षी काँग्रेस कडून ऑफर मिळत होती.’ नेटफ्लिक्स ट्विस्ट राजकारणात सहभागी होण्याच्या गोष्टीवरून कंगना म्हणाली, ‘कामावर प्रेम करते’ ‘फिल्म माणिकर्णिका नंतर मला भाजपने एक तिकीट ऑफर केलं होतं. मी माझ्या कामावर प्रेम करते, आणि मला कधीच राजकारणात जाण्याची इच्छा नाही. जे लोक माझ्या आवडत्या व्यक्तीचं समर्थन करण्यावरून मला ट्रोल करतात, त्यांनी आता थांबलं पाहिजे.’