बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार काजोल देवगण (Kajol ) ही गेल्या काही दिवसांपासून मुलगी न्यासासोबत सिंगापूरमध्ये रहात आहे. करवा चौथचं यावेळचं व्रत काजोलंन(Kajol ) सिंगापूरमध्ये साजरं केलं आहे. काजोलनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यात ती चंद्राची वाट पाहताना दिसत आहे. विचित्र हावभाव आणि तिनं दिलेलं कॅप्शन चाहत्यांना खूपच आवडल्याचं दिसत आहे.
काजोलनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. या अल्बमला तिनं हंगर गेम्स सीरिज असं नाव दिलं आहे. या फोटोत काजोल लाल रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. काजोल काही फोटोत खूप फनी हावभाव करताना दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं लाल रंगाची साडी घातली आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे. प्रत्येक फोटोत ती वेगळी पोज देताना दिसत आहे.
आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये कोजाल म्हणते, खूपच धैर्यानं आणि प्रेमानं चंद्राची वाट पहात आहे. हळूहळू गमावत आहे. सीरियल किलर होत आहे. जर जेवण नाही मिळालं तर… हे देवा आकाशात नाही तर किमान फोनवर तर चंद्र दाखव.
काजोलचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहे. तिनं एक बूमरँग व्हिडीओ देखील शेअर केला होता जो सोशलवर व्हायरल झाला होता. अनेकांनी तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.