नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – सर्वोच्च न्यायलयाच्या पाच न्यायाधीशांच्या कॉलेजीएम अर्थातच निवड मंडळाने मुंबई हायकोर्टातील न्यायधिशांना सर्वोच्च न्यायलयात न्यायमूर्ती पदी बढती दिली आहे.न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
भूषण गवई यापुर्वी नागपूर खंडपीठात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. भूषण गवई हे दिवंगत माजी राज्यपाल, रिपब्लिकन पक्षाचे (गवई गट) अध्यक्ष रा. सू. गवई यांचे जेष्ठ चिरंजीव आहे. रा. सू. गवई यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेचे अध्यक्षपद, विरोधी पक्षनेतेपद, खासदारपद भूषवल होत. रा. सू गवई यांच्या निधनानंतर रिपाई पक्षाची धुरा त्यांचे लहान सुपुत्र राजेंद्र गवई यांच्याकडे गेली आहे.
सर्वोच्च न्यायालयात एक मुख्य न्यायधीश आणि इतर २५ न्यायधीश असतात यांची निवड पद्धती ही कॉलेजीएम अर्थातचं निवड मंडळातर्फे होते ही निवड पदोन्नतीने होत असते . सुत्रांच्या माहितीनूसार न्यायमूर्ती भूषण गवई आणि हिमाचल प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश सुर्यकांत यांची वर्णी ,सर्वोच्च न्यायालयात लागली आहे .
Supreme Court Collegium comprising five judges recommends elevation of Justice Bhushan Ramkrishna Gavai and Justice Surya Kant as judges of the Supreme Court. pic.twitter.com/XBa2l6VFE3
— ANI (@ANI) May 9, 2019