मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Jitendra Awhad | राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्या कन्येचा विवाह (Marriage) अगदी साधेपणाने केला आहे. मंत्र्यांच्या मुलींचा विवाह अगदी साध्या पद्धतीने झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आव्हाड यांच्या कन्येचा विवाहसोहळा आज (मंगळवारी) पार पडला. त्यांनी आपल्या कन्येचा विवाह रजिस्टर पद्धतीने केला आहे. त्यावेळी मोजकेच पाहुणे उपस्थित होते.
अनेक नेते, मंत्र्यांच्या मुलांची लग्न म्हटलं की बँडबाजा, वरात, मोठा गाजावाजा असतो. अनेक नेते, मंत्री, अधिकारी पाहुणे यांची उपस्थित असते. तसेच, महागड्या लग्न पत्रिका, फाईव्ह स्टार हॉटेल असतात. दरम्यान, जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शाही लग्न पद्धतीला फाटा देऊन आपल्या मुलीचे अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं आहे. याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.
जा मुली तू जा दिल्या घरी तू सुखी रहा ……
बाबुल कि दुआये लेती जा
जा तुझको सुखी संसार मिले …..#NATASHA#Alan pic.twitter.com/jxn61OOUAA— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 7, 2021
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक मुलगी नताशाचा (Natasha) विवाह व्यावसायिक एलन पटेल (Alan Patel) याच्याशी रजिस्टर पद्धतीने पार पडला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यानिमित्ताने इतर लोकप्रतिनिधींसमोर आदर्श ठेवला आहे. दरम्यान, एका बापाने अशावेळी काय बोलायचं? असं सांगताना आव्हाड भावुक झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. ‘कितीही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला तरी ते होत नाही, कारण घरात दिसणारी, बागडणारी, कधीतरी अंगावर धावून येणारी, ओरडणारी आता घरात नसणार आहे, घरातील घरपण गेल्यासारखं असेल,’ अशा भावना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी व्यक्त केल्या आहेत.
Web Title :- Jitendra Awahad | registered marriage of daughter of ncp leader and minister jitendra awhad at thane.
Samantha Prabhu | घटस्फोटावर समंथाने सोडलं मौन, म्हणाली – ‘मी सगळ सहन केलं, पण गर्भपात, अफेअर…’
Modi Government | साखर निर्यातीवर मोदी सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या शेतकर्यांवर काय होणार परिणाम