पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज (मंगळवार) पुणे शहरात कोरोनाच्या (Pune Corona) 74 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या हजारांच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
तसेच गेल्या 24 तासात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 92 रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. पुणे शहरात आज 4911 संशयित रुग्णांची विविध तपासणी केंद्रावर तपासणी (Pune Corona) करण्यात आली. त्यामध्ये 74 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आजपर्यंत 37 लाख 22 हजार 395 जणांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 5 लाख 07 हजार 248 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 97 हजार 370 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
आज पुण्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. पुण्यात आजपर्यंत पुणे शहरात 9105 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 773 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 79 रुग्ण गंभीर आहेत. तर 48 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)
Web Title :- Pune Corona | Diagnosis of 74 patients of Corona in the last 24 hours in Pune city, find out other statistics
Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांनी आपल्या कन्येचे केले रजिस्टर लग्न; भावुकहून म्हणाले…
Samantha Prabhu | घटस्फोटावर समंथाने सोडलं मौन, म्हणाली – ‘मी सगळ सहन केलं, पण गर्भपात, अफेअर…’
Modi Government | साखर निर्यातीवर मोदी सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या शेतकर्यांवर काय होणार परिणाम