बहुजननामा ऑनलाइन टीम – रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आणली आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने दिग्गज कंपनीने ग्राहकांसाठी 2020 हॅपी न्यू इयर ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत, युजर एकदाच रिचार्ज करून वर्षभर विनामूल्य अनलिमिटेड सेवेचा लाभ घेऊ शकणार आहे. जिओने सांगितले की, जिओची ‘2020 हॅपी न्यू इयर ऑफर ‘मर्यादित काळासाठी आहे. ही ऑफर आजपासून अर्थात 24 डिसेंबरपासून सुरू होईल. पूर्ण ऑफर म्हणजे काय जाणून घ्या सविस्तर …
जिओच्या ‘2020 हॅपी न्यू इयर ऑफर’ मध्ये 2020 रुपये रिचार्ज केल्यावर युजरला एका वर्षासाठी अनलिमिटेड सेवा मिळणार आहे. युजरला एक वर्षासाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 1.5 जीबी 4G डेटा, दररोज 100 एसएमएस आणि जिओ अॅप्सवर विनामूल्य एक्सेस मिळणार आहे. या ऑफरची वैधता 365 दिवस म्हणजे एक वर्ष आहे.
जियोफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी रिलायंसने ऑफर दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2020 रुपयांच्या पेमेंटवर नवीन जिओफोन देखील मिळणार आहे, एवढेच नाही तर युजर्सला 12 महिन्यांच्या अनलिमिटेड सेवाही देण्यात येणार आहे.
या ऑफरअंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 0.5 जीबी डेटा, एसएमएस आणि जिओ अॅप्सची फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. या ऑफरची वैधता 12 महिन्यांसाठी म्हणजेच 365 दिवसांसाठी असणार आहे.