नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेईई मुख्य परीक्षा 2020 च्या निकालाबाबत शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मोठी घोषणा केली आहे. लवकरच जेईई मेन 2020 चा निकाल जाहीर होईल अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली. याशिवाय जेईई मेन परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे शिक्षणमंत्र्यांनी आभार मानले. त्यांनी ट्विटरवर लिहिलं की, “सरकारवर विश्वास दाखवणाऱ्या आणि जेईई मुख्य परीक्षेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मनापासून आभार. याशिवाय परीक्षेच्या निकालाची तयारी सुरू झाली असून लवकरच निकाल जाहीर होईल.
My heartfelt thanks to all students and parents for reposing trust in the government and participating in #JEEMain exam. Process for result declaration has begun and results will be announced soon. @PIB_India @MIB_India @EduMinOfIndia @DDNewslive
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) September 9, 2020
या व्यतिरिक्त, शिक्षणमंत्र्यांनी सर्व राज्य सरकार आणि त्यांचे अधिकारी, शहरातील शहर समन्वयक, परीक्षा अधिकारी यांच्या संपूर्ण समुदायाचे ही परीक्षा यशस्वी होण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.