जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – सोशल मीडियावर सध्या कोरोना व्हायरसपासून बचावासाठी अनेक संदेश पाठवले जात आहेत. त्यात कापूर आणि कोरोनाचा वैधानिक संदेश फिरत असून आयुर्वेदाच्या नावाखाली कोरोनावर उपाय म्हणून कापूर वापरण्याचा संदेश दिला जात आहे. पण भीमसेनी कापूर हा आयुर्वेदिक असून तो हवेतील न दिसणारे विषाणू नष्ट करतो, असा दावा तज्ञांनी व्यक्त केला आहे.
कोरोना सारखा व्हायरसपासून बचावासाठी अनेक पर्याय सोशल मीडियावर सुचवले जात असून सध्या व्हाट्स ऍपवर कोरोना व वैधानिक संदेश फिरत आहे. त्यात केमिकल असल्यामुळे या कापराचे होणारे दुष्परिणाम आणि त्याचा वापर टाळणे हा संदेश फिरवला जात आहे. बाजारात मिळणार कापरामध्ये केमिकल असल्याने तो जाळला तर विषाणू नष्ट होत नाहीत, तर त्यासाठी भीमसेनी कापूरच उपयुक्त ठरतो, असा दावा तज्ञांकडून केला जात आहे.
वनस्पतीपासून कापूर
कापूर, आसमनतारा आणि डिंक एका प्रकारचे अर्थात वनस्पतीपासून निर्मित झालेले असून या वनस्पतींचा कापूर जळताना त्याच्या वाफा हवेत निघतात आणि तो वितळला जातो. हा कापूर सकाळ आणि सायंकाळी जाळल्यास वातावरण शुद्ध होते. चर्मचक्षूंना न दिसणारे विषाणू, शरीराला त्रास देणाऱ्या व्याधी यामुळे नष्ट होतात. तसेच दशमूळ, गुग्गुळ, राळ, पुनर्नवा, देवदार, शिरीष, वड, पिंपळ, वेखंड, कडूनिंबाची पाने, शेणाची गोवरी, अनंतमूळ यापैकी एखादी वनस्पती व शुद्ध तूप जाळून त्याचा धूर केल्यास हवेतून येणाऱ्या जंतूंपासून संरक्षण होते. अशा वनस्पती जाळल्याने वातावरण शुद्धीसाठी आवश्यक घटक धुरातून बाहेर पडतात, असेही आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात.