भुसावळ न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Jalgaon Bhusawal Train| मध्य रेल्वेने भुसावळ विभागात जळगाव ते भादली दरम्यान (Jalgaon Bhusawal Train) तिसर्या मार्गाची जोडणी करण्यासाठी यार्ड री- मॉडलिंगचे नॉन- इंटरलॉकिंगचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे भुसावळ विभागातून धावणार्या अप- डाऊन मार्गावरील 36 प्रवासी रेल्वे गाड्या आणि 10 मालवाहतूकीच्या पार्सल गाड्या 16 व 17 जुलैला रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या ३६ प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्याने या गाड्यांनी जाणाऱ्या प्रवाशांचे आरक्षणाचे तिकीट सुध्दा रद्द होणार आहे. Jalgaon Bhusawal Train | As many as 36 trains were canceled due to two days closure in Bhusawal Railway division
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढील प्रमाणे –
– 01221 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हजरत निजामुद्दीन विशेष राजधानी एक्स्प्रेस ही गाडी 16 आणि परतीच्या प्रवासात ही गाडी 17 जुलैला रद्द.
– 02169 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -नागपूर विशेष अतिजलद गाडी 17 तर परतीच्या प्रवासात 16 जुलैला रद्द.
– 02223 पुणे- अजनी विशेष वातानुकूलित 16 तर परतीच्या प्रवासात 13 जुलैला तसेच पुणे- अमरावती विशेष वातानुकूलित 14 आणि परतीच्या प्रवासात 15 जुलैला रद्द.
– 02293 लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज विशेष दुरांतो 16 तर परतीच्या प्रवासात 17 जुलैला रद्द.
– 02161 लोकमान्य टिळक टर्मिनस- आग्रा कँट विशेष अतिजलद 16 तर परतीची गाडी 17 जुलैला रद्द.
– 02189 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागपूर दुरांतो विशेष 17 आणि परतीच्या प्रवासात 16 जुलैला रद्द.
– 02111 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- अमरावती विशेष अतिजलद 17 आणि परत येतांना 16 जुलैला रद्द.
– 01057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- अमृतसर विशेष 16 आणि परतीच्या प्रवासात 19 जुलैला रद्द.
– 01039 श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर- गोंदिया महाराष्ट्र विशेष एक्स्प्रेस गाडी 15 जुलै आणि परतीच्या प्रवासात 17 जुलैला रद्द.
– 02042 नागपूर- पुणे हमसफर विशेष गाडी 16 जुलै आणि परत येतांना 15 जुलैला रद्द.
– 02113 पुणे- नागपूर विशेष वातानुकूलित 17 जुलैला आणि परत येताना 16 जुलैला रद्द.
– 02138 फिरोजपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंजाब मेल विशेष गाडी 18 जुलै आणि परतीच्या प्रवासात 16 जुलैला रद्द.
– 02172 हरिद्वार- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष वातानुकूलित 16 आणि परतीच्या प्रवासात 15 जुलैला रद्द.
– 09105 केवडिया- रिवा विशेष विशेष गाडी 16 जुलै आणि परत येताना 17 जुलैला रद्द.
– 09125 सूरत- अमरावती विशेष अतिजलद गाडी 16 तर परत येतांना 17 जुलैला रद्द.
– 09077 नंदुरबार- भुसावळ विशेष गाडी 16 व 17 जुलैला आणि परतीच्या प्रासात 16 व 17 जुलैला रद्द.
– 09008 भुसावळ- सूरत विशेष 16 व 17 आणि परत येतांना 15 व 16 जुलैला रद्द
रद्द करण्यात आलेल्या विशेष पार्सल गाड्या
– देवळाली- मुजफ्फरपूर पार्सल विशेष 17 आणि परत येतांना 19 जुलैला रद्द.
– सांगोला- मनमाड पार्सल विशेष गाडी 17 जुलैला आणि मनमाड- दौंड पार्सल विशेष गाडी 20 जुलैला रद्द.
– पुणे-दौंड पार्सल विशेष गाडी 17 जुलैला आणि परत येतांना 20 जुलैला रद्द.
– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- शालीमार पार्सल विशेष गाडी 16 जुलैला आणि परतीच्या प्रवासात 18 जुलैला रद्द.
– हैदराबाद- अमृतसर पार्सल विशेष 16 जुलैला तर परतीच्या प्रवासात 18 जुलैला रद्द.
Web Title : Jalgaon Bhusawal Train | As many as 36 trains were canceled due to two days closure in Bhusawal Railway division
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्र पूर्णपणे Unlock नाहीच