पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Raghunath Yemul | बायको पांढऱ्या पायगुणाची आहे. तिच्या दूषित ग्रहमानामुळे तू आमदार व मंत्री होणार नाहीस, असे सांगून विवाहितेच्या छळाला कारणीभूत ठरल्याप्रकरणात कथित आध्यात्मिक गुरू रघुनाथ येमुल Raghunath Yemul (वय 48, रा. बाणेर) याला जामीन मंजूर झाला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. निमसे (S. V. Nimse) यांनी आदेश दिला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उच्चशिक्षित सुनेला अमानुषपणे वागणूक देणाऱ्या उद्योजकाच्या कुटुंबीयांसह येमुल याच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी (chaturshringi police) गुन्हा दाखल केला होता. येमुल यांच्यावर विवाहितेचा छळ, फसवणूक, हुंडा प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 27 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली होती. पोलिसांनी येमुल याला सुरवातीला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर बचाव पक्षातर्फे ॲड. प्रताप परदेशी (Adv. Pratap Pardeshi) आणि ॲड. कीर्तिकुमार गुजर (Adv. Kirtikumar Gujar) यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.
Pune-Mumbai Highway | दोन भरधाव दुचाकी भुयारी मार्गात धडकल्या, अपघातात 2 युवकांचा मृत्यू
येमुल याने फिर्यादीचा पती गणेश गायकवाड (Ganesh Gaikwad) यास “तुझी पत्नी अवदसा असून पांढऱ्या पाय गुणांची आहे. तिची जन्मवेळ चुकीची आहे, त्यामुळे ग्रहमान दूषित झाले आहेत. जर तुझी ही बायको म्हणू अशी कायम राहीली तर तू आमदार होणार नाही व मंत्री होणार नाहीस. त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे, मी देतो ते लिंबू तिच्यावरून उतरविल्यावर तुझ्या मागची पिडा कायमची निघून जाईल,” असे सांगितले होते. त्यानंतर गणेशने फिर्यादीवरून लिंबू ओवाळून टाकल्याचा प्रकार घडला. फिर्यादीचा संसार मोडण्यासाठी अनिष्ट रूढी परंपरा अघोरी कृत्याचा वापर झाल्याचे पुरवणी जबाबात फिर्यादीने नमूद केले होते.
Web Title : Raghunath Yemul | Bail for alleged spiritual guru Raghunath Yemul
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्र पूर्णपणे Unlock नाहीच