नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना गृहमंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर आता भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत मोदींच्या पहिल्या सरकारमध्ये आरोग्य मंत्री राहिलेले जगत प्रकाश नड्डा म्हणजेच जेपी नड्डा यांची भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड कऱण्यात आली आहे. जे. पी. नड्डा यांचा समावेश मंत्रिमडळात झालेला नाही. त्यामुळे भाजपच्या अध्यक्षपदाची सुत्रे त्यांच्या हाती जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र राष्ट्रीय अध्यक्षपदाची सुत्रे अमित शहा यांच्याच हाती राहतील असे सांगण्यात येत होते.
भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष राहिलेले जे. पी. नड्डा यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे. भाजप अध्यक्षाची जबाबदारी अमित शहा यांनी यशस्वीपणे सांभाळली. भाजपला या वेळी अमित शहांच्या नेतृत्वाखाली विजयश्री खेचून आणता आली. त्यानंतर त्यांचा कॅबिनेट मध्ये समावेश झाल्याने भाजपचे अध्यक्ष कोणाला केले जाणार हा प्रश्न पक्षापुढे उभा राहिला होता. त्यावेळी जे. पी. नड्डा यांचे नाव समोर आले आहे. त्यानंतर अमित शहा हेच भाजपचे अध्यक्ष राहणार आहेत. मात्र पक्षाची सुत्रं त्यांच्याच हाती राहणार आहेत. तरीही कार्यकारी अध्यक्ष म्हणून जे. पी. नड्डा राहणार आहेत. नेमकी अमित शहा यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र कार्यकारी अध्यक्षपदावरील व्यक्तीला नेमकी कोणती भूमिका देण्यात येणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
J P Nadda elected as the BJP National Working President pic.twitter.com/OZxamE78QW
— ANI (@ANI) June 17, 2019
उत्तरप्रदेशमधील यशात जे. पी. नड्डा यांचे योगदान
लोकसभेच्या सर्वात जास्त जागा असणाऱ्या उत्तरपदेशमध्ये पक्षाला यश मिळवून देण्यात जे. पी. नड्डा यांनी महत्वाची बजावली आहे. नड्डा यांनी यासाठी गुजरातमधील भाजपचे मंत्री राहिलेले गोर्धन जडाफिया यांना सोबत घेऊन उत्तप्रदेशमध्ये एनडीए ला ५० % पेक्षा जास्त मते आणि ६४ जागा मिळवणे सुनिश्चित केले. अमित शहा यांनी नड्डा यांच्यावर उत्तरप्रदेशची जबाबदारी सोपविली होती.
हिमाचलचे जे. पी. नड्डा
हिमाचल प्रदेशचे असलेले नड्डा २०१४ च्या वेळेस भाजपला मिळालेल्या यशानंतरही भाजपच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. तेव्हा भाजप अध्यक्ष असलेल्या राजनाथसिंह यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले होते त्यामुळे अध्यक्षपद रिकामे झाले होते. पण तेव्हा उत्तरपदेशमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अमित शहा यांनी बाजी मारली. तेव्हा नड्डा यांना आरोग्यमंत्रीपद देण्यात आले होते.