नवी दिल्ली : वृत्त संस्था – IT Refund |इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income Tax Department) ने चालू आर्थिक वर्षा(Fiscal year)त (2021-22) पाच जुलैपर्यंत 17.92 लाखापेक्षा जास्त टॅक्सपेयर्स(Taxpayers)ला 37,050 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम रिफंड केली आहे. हा आकडा 1 एप्रिल 2021 ते 5 जुलै 2021 दरम्यान जारी रिफंडचा आहे. यामध्ये पर्सनल इन्कम टॅक्स रिफंड 10,408 कोटी रुपये होता, तर कॉर्पोरेटचा टॅक्स रिफंड 26,642 कोटी रुपये होता. income tax department issues refunds worth rs 37050 crore until july 5
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट(Income Tax Department)ने ट्विट करून म्हटले, सीबीटीडीने 1 एप्रिल 2021 पासून पाच जुलैच्या दरम्यान 17.92 लाखापेक्षा जास्त टॅक्सपेयर्सला 37,050 कोटी रुपये परत केले आहेत. यापैकी 16,89,063 प्रकरणात 10,408 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स रिफंड आणि 1,03,088 प्रकरणात 26,642 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट टॅक्स रिफंड(Corporate tax refund) जारी केला गेला.
असे चेक करा रिफंडचे स्टेटस
– यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स ई-फायलिंग वेबसाइटवर जावे लागेल. येथे आपले पोर्टल लॉगिन करा. पोर्टल लॉगिनसाठी पॅन नंबर, ई-फायलिंग पासवर्ड आणि कॅप्चा भरा.
– पोर्टल प्रोफाईल उघडेल, त्यानंतर View returns/forms वर क्लिक करा.
– पुढील स्टेपमध्ये ड्रॉप डाऊन मेन्यूमधून Income Tax Returns वर क्लिक करून सबमिट करा. हायपरलिंक अॅकनॉलेजमेंट नंबरवर क्लिक केल्यानंतर एक नवीन स्क्रीन उघडेल.
– या स्क्रीनवर फायलिंगची टाइमलाईन, प्रोसेसिंग टॅक्स रिर्टनबाबत माहिती मिळेल.
यामध्ये फायलिंगची तारीख, रिटर्न व्हेरिफाय करण्याची तारीख, प्रोसेसिंग पूर्ण होण्याची तारीख, रिफंड जारी करण्याची तारीख आणि पेमेंट रिफंडबाबत माहिती असेल.
web title: IT Refund: Income tax department sends Rs 37,050 crore to taxpayers till July 5, check refund status
Fuel Price Hike | पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणे शक्य, RBI गव्हर्नरांनी केंद्राला दिला महत्त्वाचा सल्ला
Online Class | ऑनलाइन क्लासमध्ये कपलचा सेक्स; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल